
नाशिक | प्रतिनिधी Nashik
नाशिकसह (Nashik) राज्यातील १८ महापालिकांच्या (Municipal Corporation) निवडणुका (Election) कधी होणार, या निर्णयावर आता सर्वोच्च न्यायालयाकडून अंतिम २५ एप्रिल रोजी अंतिम सुनावणी होणार आहे....
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकराने ओबीसींच्या राजकीय आरक्षणामुळे निवडणूक विभागाने केलेली प्रभागरचना रद्द केली होती. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावर सर्वोच्च न्यायालय अंतिम सुनावणी येत्या २५ एप्रिलला करणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत.