नाशिक मनपा आयुक्त रमेश पवार यांची बदली

नाशिक मनपा आयुक्त रमेश पवार यांची बदली

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेचे आयुक्त रमेश पवार (NMC Commissioner Ramesh Pawar) यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Dr Chandrakant Pulkundwar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासनाने याबाबतचा अधिकृत आदेश आज काढला आहे. नवीन सरकार आल्यानंतर आयुक्त पवार यांची पहिलीच बदली आहे....

करोना काळात चांगली कामगिरी करणाऱ्या कैलास जाधव यांची बदली झाल्यानंतर २४ मार्च २०२२ रोजी रमेश पवार यांची नाशिकच्या मनपा आयुक्तपदी बदली करण्यात आली होती. नाशिक महापालिकेचा कार्यकाळ संपल्यामुळे प्रशासक म्हणून रमेश पवार यांनी कार्यभार हाती घेतला. तेव्हापासून नाशिक शहरातील अनेक कामांचा धडाका त्यांनी लावला होता. उत्तम प्रशासक अशी ओळख त्यांची नाशकात झाली होती.

रमेश पवार हे मुळचे देवळा तालुक्यातील भऊर या गावातील आहेत. तर ते बागलाण तालुक्याचे जावई आहेत. कसमादे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने नाशकात वास्तव्यास आहेत. त्यामुळे रमेश पवार यांच्याप्रती आपुलकी निर्माण झाली होती. त्यांच्या अचानक बदलीमुळे नाशिककरांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

मनपा आयुक्तांची बदली म्हणजे शिंदे सरकारकडून मविआ सरकारला मोठा दणका मानला जात आहे. मध्यंतरी सरकार बदलल्यानंतर अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्याचे बोलले जात असतानाच ज्या अधिकाऱ्यांनी सोयीच्या बदल्या करून घेतल्या आहेत. अशा अधिकाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com