Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक शहरातील 'या' रुग्णालयात वैद्यकिय पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाचा प्रस्ताव

नाशिक शहरातील ‘या’ रुग्णालयात वैद्यकिय पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाचा प्रस्ताव

नाशिक । प्रतिनिधी

महापालिकेच्या रुग्णालयात वैद्यकिय अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमातील 12 कोर्सेस सुरू करुन यातून महापालिकेच्या बिटको रुग्णालयासह इतर रुग्णालयात शिकाऊ डॉक्टर उपलब्ध होण्यासाठीचा प्रस्ताव आता करोनाच्या पार्श्वभूमीवर कालेज ऑफ फिजिशियन अ‍ॅण्ड सर्जन ऑफ मुंबई यांना पाठविण्यात येणार आहे…

- Advertisement -

दरम्यान, महापालिकेकडुन आत्तापर्यत तीन वेळा प्रस्ताव पाठविण्याची तयारी करुन थांबलेल्या प्रस्तावाकडे गंभीरतेने पाहत आयुक्त कैलास जाधव यांच्याकडुन पाठपुरावा सुरु करण्यात आल्याने यासंदर्भातील गोड बातमी पुढच्या काही दिवसात मिळणार आहे.

नाशिक महापालिकेकडुन आपल्या रुग्णालयात वैद्यकिय अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाचे 12 कोर्सेस सुरू होण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करुन पडला आहे. यात सर्जिकल, आर्थो, स्त्रीरोग, बालरोग, त्वचारोग, कान, नाक, घसा, रेडीओलॉजी, भुलतज्ज्ञ अशा कोर्सेचा समावेश आहे.

गेल्या नऊ वर्षात आत्तापर्यत तीन वेळा तयार करण्याच्या हालचाली झाल्या आहे. मात्र याकडे कोणीही गंभीरतेने न पाहिल्याने हा प्रस्ताव महापालिकेतच पडुन राहिला आहे.

मुंबई, पुणे महापालिकांच्या धर्तीवर नाशिक महापालिकेकडुन वैद्यकिय अभ्यासक्रमाचे हे कोर्सेस सुरू झाल्यानंतर शहरातील आरोग्य सेवेला मोठा हातभार लागणार असल्याने यासंदर्भात महापालिकेच्या वैद्यकिय अधिकार्‍यांनी पुणे येथे जाऊन पाहणी केली होती.

मात्र, नंतर हे प्रस्ताव पाठविण्यात न आल्याने याकडे दुर्लक्ष झाले होते. आता करोना काळात महापालिकेकडुन दोन तीन वेळा डॉक्टर व पॅरामेडीकलच्या जागांसाठी जाहीरात काढुन पुरेशे डॉक्टर उपलब्ध झाले नाही.

आता मात्र महापालिका प्रशासनाकडुन शिकाऊ डॉक्टर उपलब्ध व्हावेत याकरिता यासंदर्भातील प्रस्ताव तयार करुन पाठविण्याचे निर्देश आयुक्त जाधव यांनी दिले आहे. यामुळे आता हा प्रस्ताव पाठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे. हा प्रस्तावाला पाठपुराव्यानंतर मान्यता मिळाल्यास पुढच्या काही महिन्यात महापालिकेच्या वैद्यकिय विभागाला मोठे बळ मिळणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या