निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमीत्त सिटीलिंकच्या 'इतक्या' फेर्‍यांचे नियोजन

निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमीत्त सिटीलिंकच्या 'इतक्या' फेर्‍यांचे नियोजन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

बुधवारी (दि.18) श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज (Nivruttinath Maharaj) यात्रोत्सवानिमीत्त लाखो वारकरी (varkari) त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी मार्गस्थ होत आहे.

प्रत्यक्षात भाविक पायी दिंडीतून त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत असल्या तरी बुधवारी हजारो भाविकांच्या सोयीसाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या (Nashik Metropolitan Transport Corporation) वतीने जादा बसेसचे (buses) नियोजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत सिटीलिंकच्या (Citylink) वतीने तपोवन आगरातून 15 बसेसच्या माध्यमातून 106 बस फेर्‍या त्र्यंबकेश्वरसाठी केल्या जातात तर नाशिकरोड (nashik road) आगारतून 10 बसेसच्या माध्यमातून 60 बसफेर्‍या त्र्यंबकेश्वरसाठी केल्या जातात.

या नियमित बसफेर्‍या व्यतिरिक्त त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) यात्रोत्स्वानिमित्त तपोवन आगारातून 6 बसेसच्या माध्यमातून 48 तर नाशिकरोड आगारातून 4 बसेसच्या माध्यमातून 32 अश्या एकूण 10 जादा बसेसच्या माध्यमातून 80 जादा बसफेर्‍याचे नियोजन करण्यात आलेले आहे. दिनांक 18 जानेवारी व दिनांक 19 जानेवारी असे दोन दिवस जादा बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे.

जादा बसेस मिळून 18 व 19 जानेवारी रोजी रोज तपोवन आगारातून एकूण 21 बसेसच्या माध्यमातून 154 बसफेर्‍या तर नाशिकरोड आगारातून 14 बसेसच्या माध्यमातून 92 बसफेर्‍या नियोजित आहे. एकूणच दोन दिवसांत रोज 246 बसफेर्‍या भाविकांच्या सेवेसाठी त्र्यंबकेश्वर मार्गावर कार्यरत असणार आहे. जास्तीत जास्त भाविकांनी या बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन सिटीलिंकच्या वतीने करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com