CWG 2022: भारतीय बॉक्सर नितूचा 'गोल्डन' पंच

CWG 2022: भारतीय बॉक्सर नितूचा 'गोल्डन' पंच

नवी दिल्ली । New Delhi

भारतीय महिला हॉकी संघाने (Indian Women's Hockey Team) राष्ट्रकुल क्रीड स्पर्धेत (Commonwealth Creed Tournament) न्यूझीलंडवर पेनल्टी शूट आऊटमध्ये विजय मिळवून कांस्यपदक जिंकल्यानंतर बॉक्सिंगमध्ये भारताच्या नितूने घंघासने (Boxer Nitu Ganghas) ४८ किलो वजनी गटात इंग्लंडच्या डेमी जेड रेझ्टनवर ५-० असा विजय मिळवून सुवर्णपदक जिंकले आहे...

दोन वेळा जागतिक युवा बॉक्सिंगची विजेती ठरलेल्या नीतूने काल उपांत्य फेरीच्या लढतीत कॅनडाच्या प्रियंका धिल्लनचा (Canada's Priyanka Dhillon) पराभव करुन भारताचे पदक पक्क केले होते. त्यानंतर आज तिने भारतासाठी यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतले १४ वे पदक जिंकून दिले.

दरम्यान, २२ वर्षीय बॉक्सिंगपटू नितूने अल्पावधीतच या खेळात आपला ठसा उमटवला आहे. याअगोदर नितूने २०१६ मध्ये युवा राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. त्यानंतर २०१७ मध्ये बाल्कन युवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण, युवा जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तर २०१८ मध्ये तिने चार सुवर्णपदके जिंकली. त्यात आशियाई युवा अजिंक्यपद, युवा राष्ट्रीय स्पर्धा. गोल्डन ग्लोव्ह्ज स्पर्धा व युवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धांचा समावेश होता. याशिवाय २०२२ मध्ये तिने बल्गेरियातील (Bulgaria) स्पर्धा जिंकली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com