नाशिक-पुणे मार्गाबाबत गडकरींनी केली मोठी घोषणा

नाशिक-पुणे मार्गाबाबत गडकरींनी केली मोठी घोषणा
नितीन गडकरी

रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नाशिक-पुणे महामार्गाबाबत (nashik- pune)मोठी घोषणा केली आहे. नाशिक फाटा ते खेड(राजगुरुनगर) या दरम्यानच्या महामार्गाच्या सुधारित प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती नितीन गडकरी (nitin gadkari)यांनी टि्वट करुन दिली आहे. यामुळे आता प्रत्यक्ष महामार्गाच्या कामाला चालना मिळणार आहे.

नाशिक-पुणे महामार्गाचे काम हे विविध टप्प्यांमध्ये केले जात आहे. त्यातील नाशिक फाटा ते खेड (राजगुरुनगर) या दरम्यानच्या महामार्गाच्या सुधारित प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. नाशिक फाटा ते राजगुरुनगरपर्यंत वाहतुकीची नेहमीच कोंडी होत असते. यामुळे ४० ते ४५ किमीच्या या मार्गासाठी दोन-तीन तास लागतात. आता या मार्गाचा विस्तार होणार असल्यामुळे हा वेळ निम्यावर येणार आहे.

नितीन गडकरी
हार्दिक पांड्या उंची घड्याळांचा शौकिन, पाहा त्याच्याकडचे कलेक्शन

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com