लसींचे उत्पादन वाढवण्यासाठी गडकरींचा केंद्राला सल्ला; म्हणाले…

लसींचे उत्पादन वाढवण्यासाठी गडकरींचा केंद्राला सल्ला; म्हणाले…

नवी दिल्ली

कोरोना संकटावर मात करण्यासाठी सर्व लोकांना लसीचे दोन्ही डोस देणे आवश्यक आहे. सध्या भारतात दोनच कंपन्याकडून लस उत्पादन सुरू आहे. तसेच रशियाच्या स्पिटनिक व्ही चे लसीचे उत्पादन सुरु होण्याचा मार्गावर आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये लसींचा सातत्याने तुटवडा निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी लसीकरण ठप्प झाले आहे.

राज्यांनी अपुऱ्या लस पुरवठ्यावरुन केंद्र सरकारवर सातत्याने टीका होत आहे. यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लसींच्या पुरवठ्याबाबत केंद्राला सल्ला दिला आहे. ते म्हणाले, “जर लसीची मागणी ही पुरवठ्यापेक्षा जास्त असल्याने समस्या निर्माण होत असेल, तर एका कंपनीला देण्याऐवजी १० आणखी कंपन्यांना लस तयार करण्यासाठी परवाना द्या. त्यांना देशात पुरवठा होऊ करु द्या आणि नंतर जास्त निर्मिती झाल्यास ते निर्यात करु शकतात. हे १५ ते २० दिवसात केले जाऊ शकते”.

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारांसाठी योग्य व्यवस्था करण्याची सूचनाही त्यांनी केली. चंदनाऐवजी डिझेल, इथेनॉल आणि बायोगॅस इंधन आणि विजेचा वापर केला गेला तर अंत्यसंस्कार करणे स्वस्त होईल, असे गडकरी यांनी सांगितले.

लसींचे उत्पादन वाढवण्यासाठी गडकरींचा केंद्राला सल्ला; म्हणाले…
या लोकांना कोरोना लसीसाठी ९ महिने थांबावे लागणार ? का जाणून घ्या
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com