पेट्रोल-डिझेलच्या गाड्या बंद होणार का? गडकरी म्हणाले...

पेट्रोल-डिझेलच्या गाड्या बंद होणार का? गडकरी म्हणाले...
नितीन गडकरी

लोक इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत ​​असून या वाहनांची विक्रीही वाढली आहे. सुमारे २५० स्टार्टअप ई-वाहनांच्या(electric vehicle) विकासामध्ये गुंतले आहेत आणि भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती कमी होतील. सरकार इलेक्ट्रिक वाहनांसह(electric vehicle) पर्यायी इंधनांनाही प्रोत्साहन देत आहे, परंतु पारंपरिक इंजिन असलेल्या वाहनांची (petrol diesel)नोंदणी थांबणार नाही, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari)यांनी सांगितलं .

नितीन गडकरी
तारक मेहतामधील रीटा रिपोर्टने केले दुसरे लग्न

इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स या उद्योग संस्थेच्या कार्यक्रमाला वर्चुअली संबोधित करताना गडकरी म्हणाले, ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील इंधन आहे. मी स्वतः पुढील महिन्यात हायड्रोजनवर चालणारी कार खरेदी करणार आहे. विमानात वापरल्या जाणाऱ्या इंधनात ५० टक्के इथेनॉल वापरण्याचा प्रयत्न आहे.

नितीन गडकरी
हार्दिक पांड्या उंची घड्याळांचा शौकिन, पाहा त्याच्याकडचे कलेक्शन

सरकार इलेक्ट्रिक वाहनांचा वेगवान अवलंब करण्याच्या बाजूने आहे. याशिवाय इथेनॉल, बायो-एलएनजी आणि ग्रीन हायड्रोजन यांसारख्या पर्यायी इंधनांचा वापरही सरकारला वाढवायचा आहे. परंतु ज्वलनशील इंधनावर चालणाऱ्या म्हणजेच पेट्रोल-डिझेलवरील वाहनांची नोंदणी थांबवणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com