Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याफडणवीस दिल्लीत गेल्यावर...; नितीन गडकरींची तुफान फटकेबाजी

फडणवीस दिल्लीत गेल्यावर…; नितीन गडकरींची तुफान फटकेबाजी

नागपूर | Nagpur

शिंदे – फडणवीस सरकारचा (Shinde – Fadnavis government) पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) झाल्यानंतर राज्यात भाजपमध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांची तर मुंबई भाजप अध्यक्षपदी आशिष शेलार (Ashish Shelar) यांची नियुक्ती करण्यात आली.

- Advertisement -

बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये आज त्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari)उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे इतर नेते उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरींनी आपल्या स्टाइलमध्ये तुफान फटकेबाजी केली…

यावेळी गडकरी म्हणाले की, ‘जो व्यक्ती महाराष्ट्र भाजपचा प्रदेशाध्यक्ष बनतो तो पुढे काय काय बनतो हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) झाले पाहिजे. पण फडणवीस हे जर उद्या दिल्लीत गेले तर तुमचा सुद्धा राज्यामध्ये विचार होऊ शकतो, असे सूचक विधान त्यांनी केले आहे.

तसेच माझी आजकाल अशी अडचण आहे की माझ्या नावाने काहीही छापतात. जे बोललो नाही तेही छापून टाकतात अरे हिंमत असेल तर तुमच्या नावाने छापाना माझा कशाला उपयोग करता, असेही गडकरी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, आपला पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, इथे आमदाराच्या पोटातून, खासदारांच्या पोटातून खासदार आणि मुख्यमंत्र्यांच्या पोटातून मुख्यमंत्री कधी होत नाही. त्यांना सुध्दा अधिकार आहे. आज देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहे. त्यांच्या वडील गंगाधर फडणवीस (Gangadhar Fadnavis) यांच्या हाताखाली काम केले. ते आजारी असताना त्यांनी कधीही राजकारणात संधी द्या, असे सांगितले नाही.

त्यांनी मला फडणवीस यांच्याशी बोलण्यासाठी सांगतील. फडणवीस हे राजकारणात आले आणि त्यांनी स्वकर्तृत्वावर नगरसेवक, महापौर आणि मुख्यमंत्री झाले आहे, असे म्हणत गडकरींनी फडणवीसांचे कौतुक केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या