Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रगडकरी यांनी का घेतली शिवसेनेच्या दोन मोठ्या नेत्यांची भेट

गडकरी यांनी का घेतली शिवसेनेच्या दोन मोठ्या नेत्यांची भेट

मुंबई

भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिवसभरात शिवसेनेच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली आहे. शिवसेना आणि भाजपामधील संबंध कमालीचे ताणले गेले असताना झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

- Advertisement -

नितीन गडकरी यांनी सकाळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची भेट घेतली. त्यानंतर नितीन गडकरी यांनी संध्याकाळी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. यावेळी गडकरी यांनी मनोहर जोशी यांना वाकून नमस्कार करत आशीर्वाद घेतले. त्यानंतर संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृह येथे गडकरी गेले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यांशी चर्चा केली. राष्ट्रीय महामार्गसंदर्भात ही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्गासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची बैठक सुरू आहे. विशेष म्हणजे या बैठकीत नितीन गडकरीही उपस्थित असून, राज्यातील महामार्ग प्रकल्पांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली असतानाच नितीन गडकरींनी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या