Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यासंजय राऊतांनी मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांच्या माध्यमातून...; नितेश राणेंचा खळबळजनक दावा

संजय राऊतांनी मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांच्या माध्यमातून…; नितेश राणेंचा खळबळजनक दावा

मुंबई | Mumbai

भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) सातत्याने शिवसेनेच्या ठाकरे गटावर, हल्लाबोल करत आहेत. त्यांच्या निशाण्यावर सध्या माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray), आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आहे. नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना लक्ष्य केलं असून उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे.

- Advertisement -

नितेश राणे म्हणाले, संजय राऊत यांनी युवा सेना प्रमुख पदावरून आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे या दोन भावांमध्ये भांडणं लावली आहेत. शिवसेनेत आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांचा प्रभाव वाढतोय म्हणून संजय राऊत आणि त्यांच्या टोळीने षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला असा घणाघाती आरोप त्यांनी संजय राऊतांवर केला आहे.

Mann Ki Baat 100th Episode : ‘मन की बात’ माझ्या मनाची आध्यात्मिक यात्रा; पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

दरम्यान, नितेश राणे यांनी आणखी मोठा गौप्यस्फोट केला असून राणे म्हणाले की, २०१९ ला संजय राऊत यांनी मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवार यांच्या माध्यमातून स्वतःच्या नावाचा प्रस्ताव दिला होता. दरम्यान त्यांनी शरद पवारांनी हा प्रस्ताव उद्धव ठाकरेंसमोर ठेवला. परंतु उद्धव ठाकरेंच्या मनात काहीतरी वेगळंच असल्यामुळे त्यांनी संजय राऊतचं नाव नाकारलं.

दरम्यान, संजय राऊतांच नाव मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतून नाकरल्यामुळे त्यांच हे षडयंत्र सुरु झाल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला.

महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच; जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

यावेळी नितेश राणे म्हणाले की, मी उध्दव ठाकरेंना सांगतो तुमच्या दोन्ही मुलांना एकत्र ठेवायचं असेल तर याला घरात घेणं बंद करा. हा तिथेही आग लावण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती बाहेर फिरतेय.

युवासेना प्रमुखपदावरून भांडणे लावली

संजय राऊतने युवा सेना प्रमुख पदावरून आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे या दोन भावांमध्ये भांडणं लावली आहेत. महाविकास आघाडीत आदित्य ठाकरेचं प्रस्थ वाढू लागलं आहे.शिवसेनेत आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांचा प्रभाव वाढतोय म्हणून संजय राऊत आणि त्यांच्या टोळीने षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला असा घणाघाती आरोप त्यांनी संजय राऊतांवर केला आहे.

युवासेना प्रमुख म्हणून वरूण सरदेसाईंच नाव पुढे येत होतं, ते अचानक गायब झालं. यामागचं कारण म्हणजे, युवासेना प्रमुख वरुण सरदेसाई झाल्यास आदित्य ठाकरेंची ताकद वाढणार मग आमचं काय होणार म्हणून लगेच तेजस ठाकरेंच्या नावाने सामनामध्ये जाहिरात झापून आणली जायची. तेजस ठाकरेंचे बॅनर लावायला महाराष्ट्रभरातील शिवसैनिकांना सांगितलं जायचं असा दावा राणेंनी केला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या