Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यानितेश राणेंना मोठा दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर

नितेश राणेंना मोठा दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर

मुंबई | Mumbai

संतोष परब हल्लाप्रकरणी (Santosh Parab Case) आमदार नितेश राणे (Nitesh rane) यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे.

- Advertisement -

या प्रकरणी मंगळवारी सुनावणी पार पडली होती. त्यावर आज सिंधुदुर्ग न्यायालयाने (Sindhudurg District Sessions Court) निर्णय दिला आहे. आमदार नितेश राणे यांना ३० हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका झाली आहे.

आरोपपत्र दाखल होईपर्यंत नितेश राणेंना कणकवलीमध्ये जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांना आठवड्यातून म्हणजे सोमवारी पोलिसांत हजेरी लावावी लागणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीच्या काळात शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांच्यावरही आरोप करण्यात आले. त्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

१८ डिसेंबर २०२१रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हा हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून, करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार करत प्राणघातक हल्ला केला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या