विटभट्टी माफियांचे धाबे दणाणले; सायखेडा, शिंगवेतील 'इतक्या' विटभट्ट्या बंद

स्थानिक शेतकऱ्यांनी केली होती जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
विटभट्टी माफियांचे धाबे दणाणले; सायखेडा, शिंगवेतील 'इतक्या' विटभट्ट्या बंद

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गेल्या अडीच महिन्यांपासून निफाड तालुक्यातील शिंगवे आणि सायखेडा परिसरातील गोदावरी नदीच्या किनारी असलेल्या अनधिकृत विटभट्ट्यांवर अखेर जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.....(Niphad taluka shingave and saykheda village)

पर्यावरण तसेच शेतकऱ्यांना त्रासदायक ठरलेल्या २४ विटभट्ट्या कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. यामुळे येथील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. (24 bricks factories will be closed soon)

अधिक माहिती अशी की, ११ नोव्हेंबर २०२१ रोजी निफाड तहसीलदारांना (Niphad tahasildar) व यानंतर १५ नोव्हेंबर २०२१ रोजी स्थानिक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Collector suraj mandhare) यांना दिलेल्या एका निवेदनात शिंगवे तसेच सायखेडा परिसरातील विटभट्ट्याचालक कसे मनमानीपणे जमिन खोदतात.

तसेच सरकार मालमत्ता असलेली जमीन तीन फुटांपेक्षा अधिक खोदण्यास परवानगी नसताना २०-२० फुट खोल खड्डे करून माती काढली जाते आहे. पुढील काही दिवसांत नदीला जर महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर परिसरातील शेतकऱ्यांची जमीन यामुळे वाहून जाण्याची किंवा नदीत धसण्याची शक्यता असल्याबाबत तक्रार करण्यात आली होती.

यासोबतच विटा घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीतून हे हायवा किंवा डम्पर ज्यांचे वजन मर्यादा तीस टनपेक्षा अधिक आहे. ते भरधाव वेगाने इथून जातात. यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे पाईपलाईन, तसेच पिकांचे नुकसान होते. दुसरीकडे शेतकरी काही बोलले तर गाडीखाली चिरडण्याची भाषादेखील ते करतात या तक्रारीत नमूद करण्यात आले होते. (heavy weight vehicles trucks)

तसेच विटभट्टयांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे या अनधिकृत विटभट्ट्या (bricks factory) बंद करण्याची मागणी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी केली होती. तसेच येथील विटभट्ट्या अनधिकृत असून सरकारची दिशाभूलदेखील ते करत असून कमी रॉयल्टी भरत असल्याचेही जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते.

दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी घेतली होती. निफाड तहसीलदारांना याबाबत आदेश देऊन सत्यता तपासून कारवाई करण्यास सांगितले होते. यानंतर, येथील मंडळ अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी करून २४ विटभट्ट्या अनधिकृत आढळून आल्या असल्याचे समोर आले.

या सर्व विटभट्ट्या बंद करण्याचे आदेश काढण्यात आले असून निफाड उपविभागीय अधिकारी (niphad sub divisional officers) या विटभट्ट्यांवर कारवाई करणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com