Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानिफाड रेल्वे गेट दोन दिवस बंद

निफाड रेल्वे गेट दोन दिवस बंद

निफाड। प्रतिनिधी

निफाड-पिंपळगाव महामार्गावरील कुंदेवाडी गावाजवळील रेल्वे फाटक क्रमांक 99 मधील अप आणि डाऊनचे दुरुस्तीचे काम करावयाचे आहे.

- Advertisement -

गुरुवार दि.22 व शुक्रवार दि.23 रोजी निफाड रेल्वे स्टेशनजवळील या मार्गावरील रेल्वे गेट दोन दिवस बंद राहणार असल्याने वाहनचालक, प्रवाशी यांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा अशी सूचना निफाड रेल्वे स्टेशन यांचे वतीने करण्यात आली आहे.

पिंपळगाव-निफाड या मार्गावर निफाड, पिंपळगाव बाजार समितीसाठी शेतमालाची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. तसेच हा मार्ग गुजरात, शिर्डी, औरंगाबाद, वणी आदींसह प्रमुख गावांना जोडणारा असल्याने या महामार्गावर रात्रंदिवस वाहनांची मोठी वर्दळ असते. परंतू येथील रेल्वे गेट बंद असल्याने पिंपळगावहून येणार्‍या नागरिकांना नांदुर्डी, उगाव, निफाड मार्गे प्रवास करावा लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या