Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यामहाबळेश्वरपेक्षाही निफाड थंडगार

महाबळेश्वरपेक्षाही निफाड थंडगार

निफाड । प्रतिनिधी Niphad

गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यातील तापमानात मोठी घट A big drop in temperature होत असून महाबळेश्वरपेक्षाही निफाडमध्ये थंडीचा माहोल अधिक आहे.Niphad is colder than Mahabaleshwar. मंगळवारी कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रावर At Kundewadi Wheat Research Center 4.5 अंश डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. वाढत्या थंडीमुळे द्राक्षमण्यांना तडे जाणे, मण्यांमध्ये साखर उतरण्यास विलंब होणे याबरोबरच मावा, उकड्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने हातात आलेल्या द्राक्षबागा Wineyards वाचवण्यासाठी शेतकरी बागेत चिपाटे पेटवून उष्णता तयार करू लागले आहेत. तर वाढत्या थंडीमुळे द्राक्षवेलींच्या मुळ्या चोकअप होऊ नये यासाठी सकाळ-सायंकाळ बागेला ठिबकद्वारे पाणी सोडले जात आहे.

- Advertisement -

मंगळवारी (दि.25) महाबळेश्वरचे तापमान 6.5 अंश डिग्री सेल्सिअस नोंदवले गेले तर निफाडचे तापमान 4.5 अंशावर राहिले आहे. गत दोन दिवसांपूर्वीचे ढगाळ हवामान त्यानंतर पाकिस्तानमधून आलेले धूलिकण अन् दाट धुके यांचा थेट परिणाम पिकांवर होत असतानाच थंडीचा ज्वरदेखील वाढत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांची डोकेदुखी वाढली आहे. सध्याची वाढती थंडी बघता द्राक्षमणी कडक होऊन त्यांना तडे जाण्याचा धोका वाढला आहे. तसेच द्राक्षवेलींच्या मुळ्या चोकअप होऊन द्राक्षवेलींची अन्नद्रव्य तयार करण्याची प्रक्रिया मंदावणार आहे. साहजिकच थंडीमुळे मणी फुगवणीवर परिणाम होणार असल्याने द्राक्षमण्यांत साखर उतरण्यास विलंब होऊन द्राक्ष काढणीचा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

कालचे वातावरण बघता रात्रीची थंडी, पहाटेचे दव तर दुपारचे ऊन यामुळे द्राक्षबागांवर उकड्या रोगाचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. तसेच उष्णतेचा पारा आणखी खाली आला तर दवबिंदू गोठून पाने सुकणे, मण्यांना तडे जाणे असे प्रकार वाढीस लागतील. साहजिकच हातात आलेल्या बागा वाचवण्यासाठी शेतकरी सकाळ-सायंकाळ द्राक्षबागेत चिपाटे पेटवून उष्णता तयार करू लागले आहेत. तसेच द्राक्षवेलींच्या मुळ्या चोकअप होऊ नये यासाठी ठिबकद्वारे पाणी दिले जात आहे.

तसेच ढगाळ हवामानापासून बागा वाचवण्यासाठी रोगप्रतिकारक औषधांची फवारणी करावी लागत असून त्यामुळे द्राक्षबागेच्या मशागतीच्या खर्चात मोठी वाढ होऊ लागली आहे. तापमानाचा पारा दिवसागणिक खाली येत असल्याने स्वेटर, मफलर, कानटोपी, सॉक्स यांना मागणी वाढली असून सकाळ-सायंकाळ वाडी-वस्त्यावर शेकोट्या पेटवल्या जाऊ लागल्या आहेत. साहजिकच वाढत्या थंडीमुळे सकाळ-सायंकाळ रस्ते सुनसान होऊ लागले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या