बस-कारचा भीषण अपघात; ९ जणांचा मृत्यू

बस-कारचा भीषण अपघात; ९ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली | New Delhi

सगळीकडे नववर्षाच्या (New Year) स्वागताची जय्यत तयारी सुरू असतांना गुजरातमधील (Gujarat) नवसारी जिल्ह्यात बस आणि फॉर्च्युनर (Bus and Fortuner) कारची धडक झाल्याने भीषण अपघात (Accident) घडला आहे...

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नवसारीमधील राष्ट्रीय राजमार्ग ४८ वर वेसमा गावाजवळ हा अपघात घडला असून या अपघातात कारमधील नऊ प्रवाशांपैकी नऊ जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. तर २८ जण जखमी (injured) झाले आहेत. तसेच यातील ११ जणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बस सूरत (Surat) येथून वलसाडला चालली होती.

दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की, यात फॉर्च्युनरचा चुराडा झाला असून मृतदेह (Dead Body) बाहेर काढण्यासाठी कटरचा वापर करावा लागला. तर जखमी लोकांना बाहेर काढण्यास उशीर झाला. तसेच ही कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेला चालली होती अशी माहिती नवसारीचे पोलीस अधिक्षक ऋषीकेश उपाध्याय (Rishikesh Upadhyay) यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com