Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशकोरोना संकट : ९ देशांकडून भारतीय प्रवाशांना बंदी

कोरोना संकट : ९ देशांकडून भारतीय प्रवाशांना बंदी

नवी दिल्ली

भारतात आढळलेल्या कोरोनाच्या डबल म्युटेंट स्ट्रेनमुळे जगभरात दहशत पसरली आहे. भारतात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले असून दैनिक रूग्णसंख्या वाढ गेल्या दोन दिवसांपासून तब्बल साडेतीन लाखांवर पोहोचली आहे. यामुळे संयुक्त अरब अमिरातीसह ९ देशांनी भारतीय प्रवाशांवर बंदी घातली आहे. अमेरिकेनेही भारतीयांसाठी मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे.

- Advertisement -

शरद पवार रुग्णालयात : तोंडातील अल्सरवर शस्त्रक्रिया

दुबई, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ओमान, हाँगकाँग तसेच फ्रान्सनेही भारतीय प्रवाशांवर बंदी घातली आहे. भारतातून येणारी तसेच भारताकडे जाणारी सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. कॅनडाने पुढील ३० दिवसांसाठी ही बंदी घातली आहे. ब्रिटनमध्ये भारतीयांच्या आगमनावर ‘रेड लिस्ट’ निर्बंध लागू झाले आहेत. ब्रिटनमध्ये भारतीय डबल म्युटेंट स्ट्रेनने बाधित ५५ नवे रुग्ण आढळले.

गल्फ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, ही बंदी २४ एप्रिल रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी लागू होणार आहे. दहा दिवसानंतर प्रवेश बंदीबाबत फेरआढावा घेण्यात येणार आहे. युएईचे नागरिक, राजनयिक पासपोर्टधारक आणि सरकारी शिष्टमंडळांना या बंदीतून वगळण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या