‘NIMA POWER-2023’ : नाशिकला इलेक्ट्रील, इलेक्ट्रॉनिक क्लस्टर व प्रदर्शन केंद्र होणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पालकमंत्र्यांनी जागा निश्चितीचे अधिकार देत नाशिकला इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक क्लस्टर आणि प्रदर्शन केंद्र उभारण्याची घोषणा उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांनी नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (निमा) तर्फेआयोजित ‘निमा पॉवर प्रदर्शन २०२३’ च्या उद्घाटनप्रसंगी दिले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री दादा भुसे, आ.सीमा हिरे, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे,सचिव राजेंद्र अहिरे,प्रदर्शन समितीचे अध्यक्ष मिलिंद रजपूत,व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेचे सहसंचालक प्रफुल्ल वाकडे, एमआयडीसीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे,प्रदर्शनाचे प्रायोजक हरीशंकर बॅनर्जी, एबीपी लिमिटेडचे प्लांट हेड गणेश कोठावदे,सिद्धार्थ शहा,विवेक गर्ग,शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी,जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते,आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले कि,दादा भुसे यांची दादागिरी नाहीतर आम्हाला त्यांचा भीतीयुक्त आदर वाटतो नाशिकसाठी क्लस्टर मंजूर करून जाणार असे अभिवचन मी भाषणाच्या सुरुवातीला दिले आणि मी माझा शब्द पाळला आहे.आता जागा निश्चितीचे अधिकार पालकमंत्र्यांना दिले असून ते आणि निमा सांगतील तेथे हे क्लस्टर होईल,असेही ना.सामंत यांनी स्पष्ट केले.

दिंडोरी आणि घोटी परिसरात उद्योगासाठी होणाऱ्या नवीन जमीन अधिग्रहणाबरोबरच जुन्या अस्तित्वात असलेल्या एमआयडीसीच्या विस्तारचेही काम हाती घेतले असून तेथेही अधिग्राहणाची प्रक्रिया पूर्ण होत आलेली आहे . जाहीर केलेल्या या इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरच्या जागेत नवीन अँकर कंपन्या नक्कीच येतीलच परंतु त्याआधी नाशिकच्या आत्ता अस्तित्वात असलेल्या मोठ्या कंपन्यांनी अँकर युनिट म्हणून काम सुरू करावे, नवीन जागेवर उद्योग उभारणीचे किंवा अधिक ग्रहणाचे काम सुरू असताना होत असलेला विरोध लक्षात घेता विचारांची देवाण-घेवाण करून स्थानिक लोकांची समजूत काढण्याची जबाबदारी निमा सारख्या संघटनांनी घ्यावी, असेही ते पुढे म्हणाले.

एकीकडे प्रकल्प यावेत म्हणून प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे या प्रकल्पांना त्रास देणाऱ्या प्रवृत्तीही वाढत असल्याची खंत व्यक्त करून ना. सामंत यांनी ‘अमाथाडी’ कामगार संघटनांवर जोरदार टीका केली.त्रास देणाऱ्या अशा कोणत्याही संघटना असल्यास त्वरित शासनाशी संपर्क करा. आम्ही त्याचा बंदोबस्त करू.परंतु असे करताना खऱ्यात माथाडी कामगार संघटनांवर अन्याय होणार नाही याची तुम्ही सुद्धा काळजी घ्या असा सल्लाही त्यांनी दिला.

यावेळी बोलतांना पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले कि,नाशिकसाठी चारशे खाटांचे मेडिकल कॉलेज मंजूर झाले असून लवकरच त्याची भूमिपूजन होईल.एनडीएत मुलींच्या प्रवेशासाठीचे राज्य पातळीवरील भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र लवकरच नाशिकला सुरू होईल.

प्रास्तविकात निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी सांगितले कि,उद्योजकांच्या विविध समस्या आम्ही संस्थेतर्फे उद्योग मंत्र्यापुढे नेहमीच मांडत असतो परंतु आज कुठलीही समस्या न मांडता आज नाशिककरांसाठी नाशिकच्या उद्योजकांसाठी आणि नाशिकच्या भावी पिढी करता आज मागणी करणार आहे असे सांगत नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातील मोठा अनुशेष भरून काढण्यासाठी गतिमान शासन वेगवान निर्णय या आपल्या ब्रीदवाक्य प्रमाणे शासनाने सर्वतोपरी पावले उचलावीत,उद्योग विस्तारास नाशिक हेच एकमेव डेस्टिनेशन असल्याचे आमचा यावर्षीचा अजेंडा असून आता येथे मोठ्या गुंतवणुकीचे प्रकल्प आणण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा.

गंगापूर धरणातील गाळ काढण्यास प्रारंभ

यावेळी प्रदर्शनाचे अध्यक्ष मिलिंद राजपूत यांनी प्रदर्शन घेण्यामागचा उद्देश स्पष्ट करतांना या प्रदर्शनात कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतच्या उद्योजकांच्या विविध कलाविष्कारांचा समावेश असल्याचे नमूद केले. आभार राजेंद्र अहिरे यांनी मानले. सूत्रसंचालन परी जोशी हिने केले.

यावेळी नाइसचे अध्यक्ष विक्रम सारडा,निमाचे खजिनदार विरल ठक्कर, उपाध्यक्ष किशोर राठी आशिष नहार ,हर्षद ब्राह्मणकर, माजी अध्यक्ष विवेक गोगटे, डीजी जोशी, मंगेश पाटणकर, मग्नेश कोठारी, ,नितीन वागस्कर,शशांक मणेरीकर,प्रवीण वाबळे, किरण वाजे,दिलीप वाघ, विजय जोशी, चेंबरचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, लघुउद्योग भारतीचे संजय महाजन, विजय वेदमुथा, राकेश पाटील, शिवाजी नरवडे, दर्शन वाळके , शैलेश नारखेडे, आकांक्षा पावर चे मधुभाई, आदीं अनेक उद्योजकांबरोबरच विविध उद्योग संघटनांचे पदाधिकारी आणि एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, कामगार उपायुक्त कार्यालय,डी आय सी, पोलीस प्रशासन, आधी विविध शासकीय अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

निमा प्रदर्शनात विविध मान्यवारांची व्याख्याने

निमातर्फे आयोजित पॉवर प्रदर्शनात सेमिनार हॉलमध्ये उद्या शनिवार (दि. 20 मे) उद्योग क्षेत्रातील विविध तज्ज्ञ मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा,असे आवाहन निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे आणि स्टार्टअप समितीचे चेअरमन श्रीकांत पाटील यांनी केले.

सकाळी ११ वाजता सीपीआरआयचे सहसंचालक एस.शामसुंदर,दुपारी १२:३० वाजता डब्ल्यू.आर. सोलरचे संचालक वेदांत राठी, दुपारी दोन वाजता ई-स्मार्ट सोल्युशनचे कार्यकारी संचालक आनंद राय दुपारी चार वाजता एचएएलचे वरिष्ठ अधिकारी हे बी टू बी , स्वदेशीकरणं,टुलिंग आऊटसर्सिंग,वेंडर रजिस्ट्रेशन आदी विषयांवर मार्गदर्शन करतील.