NIMA POWER-2023 : नाशकातील 'सीपीआयआर टेस्टींग लॅब' लवकरच कार्यान्वित होणार - एस. शामसुंदर

NIMA POWER-2023 :  नाशकातील 'सीपीआयआर टेस्टींग लॅब' लवकरच कार्यान्वित होणार - एस. शामसुंदर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

इलेक्ट्रीक व इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील उत्पादन वाढीच्या दृष्टीने अंतराष्ट्रीय मानके तसेच उत्पादनाची गुणवत्ता तपासणी करण्यासाठी येत्या डिसेंबर अखेरपर्यंत नाशिक मध्ये सिपीआयआर टेस्टींग लॅब कार्यान्वित होणार आसल्याची माहिती सीपीआरआयचे सहसंचालक एस. शामसुंदर यांनी आज 'निमा पाॅवर-२०२३' प्रदर्शनात पत्रकार परिषदेप्रसंगी दिली.

भारतात पहिल्यांदाच 1960 साली सिपीआयार ही टेस्टिंग लॅबची स्थापना बेंगलोरला करण्यात आली होती या नंतर भोपाळ तर तिसरी लॅब ही नाशिक मध्ये करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सातपूर येथील आयटीआयच्या मैदानावर नाशिक इडट्रीज अॅड मॅन्यूफॅक्चर असोसिएशन तर्फे निमा पाॅवर २०२३ या औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनात शेकडो मोठ्या ब्रॅन्ड कंपन्यानी आपले स्टाॅल लावले आहेत. नाशिक मधील शिलापूर येथील शेकडो एकरवर उभारण्यात येत असलेल्या सिपीआयआर टेस्टिंग लॅबचे काम पुर्ण होत असून पहील्या टप्प्यातील किमान तीन प्रकारचे टेस्टिंग चाचणी बरोबर उत्पादन सर्टिफिकेटस ही सुविधा ही देण्याचा प्रयत्न येत्या डिसेंबर २०२३ पर्यंत करण्याचा मानस आसल्याचे सह संचालक शाम सुंदर यांनी यावेळी सांगितले.

NIMA POWER-2023 :  नाशकातील 'सीपीआयआर टेस्टींग लॅब' लवकरच कार्यान्वित होणार - एस. शामसुंदर
'NIMA POWER-2023' : नाशिकला इलेक्ट्रील, इलेक्ट्रॉनिक क्लस्टर व प्रदर्शन केंद्र होणार

ते पुढे म्हणाले की, पहील्या टप्प्यात या तिन सुविधा नंतर दुसऱ्या टप्प्यातील सुविधाही लवकरच सुरू होणार आहेत. तसेच यामुळे नाशिकसह महाराष्ट्रातील इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रीक उत्पादन करणार्या कंपन्याना मोठा फायदा होणार असून यातील आनेक कंपन्याना अंतराष्ट्रीय स्तरावरील मानकांची टेस्टिंग या लॅब मध्ये करता येणार आसल्याने एक्सपोर्टचा व्यवसाय वाढण्यास मदत होणार आहे. यावेळी निमाचे अध्यक्ष धंनजय बेळे. निमा पाॅवरचे अध्यक्ष मिलिंद राजपूत.राजेद्र अहीरे.आशिष नहार.दिलीप वाघ आदी उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com