केसरकर नोकरी पाहिजे? आमच्याकडे 'ही' जागा खाली; निलेश राणेंची ऑफर

केसरकर नोकरी पाहिजे? आमच्याकडे 'ही' जागा खाली; निलेश राणेंची ऑफर

मुंबई । Mumbai

बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे प्रवक्ते आणि कोकणातील आमदार दिपक केसरकर (MLA Deepak Kesarkar) यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीयमंत्री नारायण राणेंचा (Union Minister Narayan Rane) उल्लेख करत पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट केला होता. त्यामुळे नारायण राणे कुटुंबीय आणि दीपक केसकर यांच्यातील वाद आणखी चिघळल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर आता पुन्हा निलेश राणे यांनी ट्वीट करत केसरकरांना खोचक टोला लगावला आहे...

निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटले की, दिपक केसरकर म्हणतो, मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे. नोकरी मागायची आहे तर नीट मागा. १ तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे, असे राणे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, याअगोदर निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केसरकरांवर टीका करतांना म्हटले होते की, तुम्ही शिंदेसाहेबांच्या गटाचे प्रवक्ते असू शकता, आमचे नाही. तुम्हाला कुबड्या मिळाल्या आहेत. त्या कुबड्यावर तरी व्यवस्थित चाला, नाहीतर मतदारसंघात (Constituency) तुमचा विषय आटोपला होता. तुम्हाला दुसरे राजकीय जीवनदान मिळाले आहे, अशा शब्दांत केसरकरांना इशारा दिला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com