निहार ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट

निहार ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नातू (Grandson of Shiv Sena chief Balasaheb Thackeray) आणि बिंदूमाधव ठाकरे यांचे पुत्र निहार ठाकरे(Bindumadhav Thackeray's son Nihar Thackeray) यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांची भेट घेतली.

आम्‍ही शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका घेऊन पुढे जात आहोत. त्‍याचे समर्थन निहार ठाकरे यांनी केले असल्‍याचे मुख्यमंत्री शिंदे म्‍हणाले. मी एक वकिल आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्‍यांच्या वाटचालीत जी काही कायदेशीर मदत लागेल ती करायला आपण तयार असल्‍याचे निहार ठाकरे यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्‍यानंतर निहार ठाकरे हे त्‍यांची भेट घेणारे ठाकरे घराण्यातील दुसरे व्यक्‍ती आहेत. दोन दिवसांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नुषा स्‍मिता ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली होती.

आज निहार ठाकरे यांनी शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचा विचार घेउन पुढे जात आहेत.त्‍यांना आमच्या शुभेच्छा आणि पाठिंबा आहे. मी एक वकिल असून लॉ फर्मही चालवतो. शिंदे यांना त्‍यांच्या वाटचालीत जी कायदेशीर मदत लागेल ती देण्याची माझी तयारी असल्‍याचे निहार ठाकरे यावेळी म्‍हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com