देशातील या राज्यांनी घोषित केली रात्रीची संचारबंदी अन् निर्बंध

देशातील या राज्यांनी घोषित केली रात्रीची संचारबंदी अन् निर्बंध

कोरोना व्हायरसचा (Corona Virus) नवीन व्हेरिएंट (New Variant) ओमायक्रॉननं (Omicron) चिंता वाढवली आहे. केरळपासून जम्मू-काश्मीरपर्यंत देशातील 14 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. ख्रिसमस (Christmas) तसंच नवीन वर्षानिमित्त (New Year) अनेक राज्यांकडून नवीन निर्बंध लावले जात आहे. गुरुवारी मध्य प्रदेशात रात्रीची संचारबंदी (night curfew)लागू केल्यानंतर आज उत्तर प्रदेशातही (night-curfew)लावण्याची घोषणा झाली.

देशातील या राज्यांनी घोषित केली रात्रीची संचारबंदी अन् निर्बंध
ओमायक्रॉनमुळे चिंता : राज्याची नियमावली आज, जाणून घ्या काय असतील निर्बंध

उत्तर प्रदेशातील योगी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. २५ डिसेंबरपासून राज्यात नाइट कर्फ्यू लागू करण्याची घोषणा करण्यात आली. तसेच लग्न समारंभासंदर्भात निर्बंध जाहीर झाले. लग्नात कोव्हीड प्रोटोकॉलसह २०० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली. यासंदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिशा-निर्देश जारी केले आहेत.

मध्य प्रदेशात गुरुवारपासून रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंंदी असणार आहे. मध्य प्रदेशात सध्या कोरोनाचे ९७ रुग्ण आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com