Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यादाऊदची माहिती द्या अन् मिळवा मोठं बक्षीस; एनआयएकडून घोषणा

दाऊदची माहिती द्या अन् मिळवा मोठं बक्षीस; एनआयएकडून घोषणा

मुंबई | Mumbai

एनआयए (NIA) कडून दाऊद इब्राहिमबाबत (Dawood Ibrahim) मोठी घोषणा करण्यात आली आहे. दाऊदची माहिती देणाऱ्याला आता 25 लाखांचं बक्षीस देण्यात येणार आहे…

- Advertisement -

दाऊदच नाही तर त्याच्या साथीदारांचीही माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळणार असल्याचेही एनआयने म्हटले आहे. प्रत्येक साथीदारावर वेगवेगळी रक्कम जाहीर करण्यात आली आहे.

भारतात सगळ्या काळ्या धंद्यांमध्ये दाऊद इब्राहिमचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. ड्रग्स, हत्यारं, स्फोटके अशा अनेक धंद्यामागे त्याचे हात असल्याने फुस मिळते आहे.

ज्यातून देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचत आहे. त्यामुळे दाऊदची माहिती देणाऱ्याला 25 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे एनआयएकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या