
दिल्ली | Delhi
देशाच्या कानाकोपऱ्यात असंख्य घडामोडी सुरु असतानाच राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएकडून मोठी कारवाई करण्यात आली. देशभरातील ६ राज्यांमध्ये जवळपास १०० हून अधिक ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आली.
देशातील दहशतवाद, गँगस्टर आणि अमली पदार्थांची तस्कर याला आळा घालण्यासाठी एनआयएकडून हे छापे टाकले जात आहेत. हरियाणा (Haryana), पंजाब (Punjab), राजस्थान (Rajasthan), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), उत्तराखंड (Uttarakhand) आणि मध्य प्रदेश (Madhya Pradesh या सहा राज्यांमध्ये NIAने ठिकाणी छापेमारी केली आहे.
एनआययएने या वर्षात साधारणपणे तीन वेळा मोठी कारवाई करत तीन वेळा छापेमारी केली आहे. एजन्सीने यावर्षी 25 जानेवारी रोजी मोहाली येथील पंजाब पोलिस इंटेलिजन्स मुख्यालयावर आरपीजी हल्ल्यातील मुख्य शूटर दीपक रंगा याला उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून अटक केली होती.
कॅनडास्थित गुंड-दहशतवादी लखबीर सिंग संधू ऊर्फ लंडा आणि पाकिस्तानस्थित गँगस्टर-दहशतवादी हरविंदर सिंग संधू ऊर्फ रिंडा यांचा तो जवळचा सहकारी होता. आरपीजी हल्ल्यातील त्याच्या सहभागाव्यतिरिक्त, दीपक इतर अनेक हिंसक दहशतवादी आणि गुन्हेगारी गुन्ह्यांमध्ये सामील आहे. ज्यात हत्यांचा समावेश आहे.
विदेशी दहशतवादी संघटना आणि दहशतवादी घटक देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या संघटित गुन्हेगारी टोळ्यांचे नेते आणि सदस्य यांच्यासोबत मिळून लक्ष्यित हत्या आणि हिंसक घटना घडवून आणत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर एनआयएने 20 सप्टेंबर 2022 रोजी गुन्हा दाखल केला होता.