NIA कडून महाराष्ट्रासह इतर राज्यात PFI संबधित ठिकाणांवर छापेमारी

NIA
NIA

मुंबई | Mumbai

पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) संघटनेवर पुन्हा एकदा सरकारची वक्रदृष्टी पडली आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यात पीएफआयच्या ठिकाणांवर एनआयएकडून छापेमारी केली जात आहे. महाराष्ट्रात एकूण 3 ते 4 ठिकाणी पीएफआयवर कारवाई सुरू असल्याने खळबळ उडाली आहे.

आज सकाळपासूनच राष्ट्रीय तपास यंत्रणेने ही कारवाई सुरू केली आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांत कारवाई सुरू आहे. पीएफआय संघटनेशी संबंधित ही कारवाई असल्याचे सांगण्यात आले. याआधीही सन 2022 मध्ये संघटनेवर मोठी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा या संघटनेच्या नाड्या आवळण्यासाठी ही कारवाई सुरू करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

7/11 ट्रेन बॉम्बस्फोटातील आरोपी वाहिद शेख याच्या घरावर एनआयएनं छापे टाकले आहेत. 2007 मध्ये ट्रेन स्फोटात वाहिदला अटक करण्यात आली होती. मात्र 2015 मध्ये त्याला न्यायालयानं सर्व दोषापासून मुक्त केल्यानं तो बाहेर आहे. एनआयएचे एक पथक मुंबईतील विक्रोळी भागात राहणाऱ्या अब्दुल वाहिद शेखच्या घरी पोहोचले. हे छापे टाकण्यासाठी आलेल्या एनआयए, पोलीस आणि स्थानिकांमध्ये वाद झाला. वाहिदनं घराचा दरवाजा उघडण्यास नकार दिला. त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं.

शेखचा दावा आहे की पोलिसांचे पथक छापा टाकण्यासाठी पहाटे 5 वाजता त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. संघाला नोटीस दाखवण्यास सांगून त्याने दरवाजा उघडला नाही. “ते मला कोणतीही नोटीस दाखवत नाहीत म्हणून मी दार उघडले नाही. मुख्य दरवाजा तोडला. म्हणून मी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. स्थानिक पोलिस इथे आहेत आणि सगळे माझ्या घराला घेरलं घालत आहेत,” तो म्हणाला.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com