Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रडी-कंपनी NIA च्या रडारवर; मुंबईत अनेक ठिकाणी छापेमारी

डी-कंपनी NIA च्या रडारवर; मुंबईत अनेक ठिकाणी छापेमारी

मुंबई | Mumbai

मुंबईत (Mumbai) एनआयए (NIA) अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी संबंधितांच्या ठिकाणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

एनआयएने मुंबईतील २० ठिकाणी छापे टाकले आहेत. ही २० ठिकाणे दाऊदचे शार्प शूटर, तस्कर, डी-कंपनीचे रिअल इस्टेट मॅनेजर यांच्याशी जोडलेली आहेत.

या सर्वांचे कनेक्शन १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी असल्याचे सांगितले जात आहे. एनआयएने नागपाडा, गोरेगाव, बोरिवली, सांताक्रूझ, मुंब्रा, भेंडी बाजार या ठिकाणी छापेमारी केली असल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या