मुंबईवर पुन्हा दहशतवादाचे सावट? पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेतलेल्या धोकादायक व्यक्तीचा शहरात वावर, NIA चा अलर्ट

मुंबईवर पुन्हा दहशतवादाचे सावट? पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेतलेल्या धोकादायक व्यक्तीचा शहरात वावर, NIA चा अलर्ट

मुंबई | Mumbai

राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएकडून (NIA) मुंबई पोलिसांना (Mumbai Police) सतर्क राहण्याचा ई-मेल (E-Mail) पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत (Mumbai News) सध्या एका धोकादायक व्यक्तीचा वावर असल्याचा उल्लेख या ई-मेलमध्ये असल्याचं कळत आहे.

सरफराज मेमन असं या व्यक्तीचं नाव असल्याचंही मेलमध्ये सांगण्यात आलं आहे. मुंबईत घातपात घडवण्यासाठी तर ही व्यक्ती उपनगरांतून फिरत नाही ना, असा संशय NIA ला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांना ताबडतोब सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबईवर पुन्हा दहशतवादाचे सावट? पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेतलेल्या धोकादायक व्यक्तीचा शहरात वावर, NIA चा अलर्ट
कसबा पोटनिवडणुकीतील BJP उमेदवार हेमंत रासनेंवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

मुंबईत फिरत असलेली ही संशयित व्यक्ती मूळची इंदूर येथील राहणारी असल्याचं NIA ने पाठवलेल्या ईमेलमध्ये सांगण्यात आलंय. तसेच या व्यक्तीने चीन, हाँगकाँग आणि पाकिस्तानमध्ये दहशवादी कारवायांचं प्रशिक्षण घेतल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे मुंबईसाठी ही व्यक्ती धोकादायक ठरू शकते, असा इशारा NIA ने दिला आहे.

संशयित व्यक्तीसंबंधी काही कागदपत्रही NIA ने मुंबई पोलिसांना पाठवले आहेत. यात सदर व्यक्तीचं आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स आणि एलसी कॉपीही जोडण्यात आल्या आहेत. NIA मुंबई तसेच इंदूर पोलिसांशी संपर्क साधून ही माहिती दिली आहे.

मुंबईवर पुन्हा दहशतवादाचे सावट? पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेतलेल्या धोकादायक व्यक्तीचा शहरात वावर, NIA चा अलर्ट
आत्ता ट्रेलर, टिझर काहीही नाही... २२ तारखेला सिनेमाच दाखवतो; राज ठाकरेंची गर्जना

दरम्यान फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभीच NIA ला एका अज्ञात व्यक्तीने ईमेल पाठवला होता. त्यात त्याने आपण तालिबानी असल्याचा दावा केला होता. तसेच मुंबईत अतिरेकी हल्ला करण्याची धमकीही दिली होती. NIA ने या प्रकरणी मुंबई पोलिसांना संपूर्ण घटनाक्रम समजावून सांगितला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांत अलर्ट जारी करण्यात आला होता.

मुंबईवर पुन्हा दहशतवादाचे सावट? पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेतलेल्या धोकादायक व्यक्तीचा शहरात वावर, NIA चा अलर्ट
'गंगामाई'च्या इथेनॉल प्रकल्पातील भीषण आगीचं कारण आले समोर
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com