सचिन वाझेच्या २०० पानी डायरीत आहे काय? कोणाचे पत्ते उघडणार ?

सचिन वाझे
सचिन वाझेSachin Vaze

मुंबई :

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटके ठेवल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) मुंबई पोलीस दलातील एपीआय सचिन वाझेला अटक केली. या अटकेनंतर एनआयएच्या पथकाने वाझेच्या कार्यालयाची झडती घेतली. त्यात अनेक वस्तू मिळाल्या आहेत. त्यापैकी २०० पानांची डायरी मोठे खुलासे करेल, असा दावा एनआयएने केला आहे.

वाझेच्या डायरीतून अनेक आर्थिक व्यवहार उघडकीस येण्याची शक्यता आहे. कोणत्या दिवशी कोणाला भेटायचे आहे, याचीही तारीख डायरीत नमूद करण्यात आली आहे. पब्ज, बार, बुकी आणि इतर महत्त्वाच्या कारवायांचा उल्लेख डायरीत केला आहे. यामुळे या डायरीतून हफ्त्याची गुपिते उघडकीस येण्याची शक्यता आहे. डायरीत मुंबईतील सर्व बार, पब आणि हुक्का पार्लरची यादी आहे. ज्यांनी पैसे दिले त्याबाबत कोड भाषेत नोंद आहे. ही कोडभाषा उलगडण्याचा प्रयत्न एनआयए करत आहे. तसेच कुणाला किती पैसे जात होते, याचा हिशेब सचिन वाझे ठेवत होते.

काय आहे कोड भाषा

डायरीत सचिन वाझेने लाखाच्या नोंदीसाठी L, तर हजाराच्या नोंदीसाठी K हे अक्षर वापरले आहे. बार, पब, हुक्का पार्लर यांची येणारी रक्कम आणि दिलेली रक्कमही लिहिली आहे. पैशाचं वाटप नियमित होत होते. त्याबाबतही कोड भाषेत नोंद आहे. व्यक्तीऐवजी विभाग लिहिण्यात आला आहे. एनआयए आणि ईडी समांतर तपास करणार आहे.

मोबाईलमधूनही महत्त्वाचे पुरावे

सचिन वाझेचा मोबाईल एनआयएने जप्त केला होता. त्या मोबाईलमधूनही महत्त्वाचे पुरावे हाती लागले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे मोबाईल व डायर कोणाचे पितड उघड करणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.

ईडीचा ससेमिरा लागणार

राष्ट्रीय तपास यंत्रणेनंतर आता महाविकास आघाडी सरकारच्या मागे आणखी एका केंद्रीय यंत्रणेचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. सक्तवसुली संचलनालय (ईडी) स्वत:हून या प्रकरणाची चौकशी करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com