ISIS कनेक्शनवरून महाराष्ट्रासह ६ राज्यांत NIA कडून छापेमारी

NIA
NIA

मुंबई | Mumbai

ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंधीत प्रकरणावर राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA ने देशभरात महाराष्ट्रासह ६ राज्यात छापे टाकले आहे. सहा राज्यांत एकूण १३ ठिकाणी एनआयएकडून छापा टाकून झाडाझडती घेण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील नांदेड आणि कोल्हापूरमध्ये ही छापेमारी सुरू असून या कारवाईमध्ये ज्या लोकांचा ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंध आहे त्यांना ताब्यात घेण्यात आलं असून यामध्ये संशयितांकडून नवीन मुलांना या संघटनेत सहभागी करणे, त्यांची दिशाभूल करणे असे कामं केले जात होते. या प्रकरणावर तपास संस्थेची टीम अनेक दिवसांपासून काम करत होती. त्यांनंतर सर्व ठिकाणी एकाच वेळी छापा टाकण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com