Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यापीएफआय संघटनेवर एनआयए आणि ईडीची मोठी कारवाई

पीएफआय संघटनेवर एनआयए आणि ईडीची मोठी कारवाई

मुंबई | Mumbai

वादग्रस्त संघटना असलेली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (Popular Front of India) आता एनआयए आणि ईडीच्या रडारवर आली असून तब्बल १३ राज्यांमध्ये पीएफआयच्या शंभरहून अधिक ठिकाणांवर छापेमारी (Raid) करण्यात आली आहे…

- Advertisement -

एनआयए (NIA) आणि ईडीने (ED) महाराष्ट्रातील मुंबईसह पुणे, मालेगावमध्ये छापे टाकले असून या प्रकरणात आतापर्यंत २० जणांना अटक (Arrested) करण्यात आली आहे. यात मालेगावमधून सैफु रहेमान (Saifu Rahman) नामक व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.

तसेच पीएफआयची पुण्यात चार ठिकाणी छापेमारी सुरू असून पीएफआयचे नेते रझी अहमद खान (Razi Ahmad Khan) यांच्या कोंढव्यातील घरावर कारवाई करण्यात आली आहे. तर नवी मुंबईतील नेरूळच्या सेक्टर २३ मधील धारावे गावातही एनआयएने धाड टाकली आहे.

गेल्या काही दिवसांत एनआयएने या प्रकरणात एक डझनहून अधिक गुन्हे दाखल केले होते. त्यामध्ये पीएफआयशी संबंधित धागेदोरे सापडले होते. ईडी, एनआयए आणि राज्य पोलिसांनी पीएफआयशी संबंधित १०० हून अधिक जणांना वेगवेगळ्या प्रकरणात अटक केली आहे. यामध्ये पीएफआयचा प्रमुख परवेझ अहमद (Parvez Ahmed) याच्याही एनआयएने दिल्लीतून मुसक्या आवळल्या आहेत.

तसेच एनआयएने उत्तर प्रदेश, केरळ, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, तामिळनाडू यासह अनेक राज्यांमध्ये पीएफआय आणि त्याच्याशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली. यात १० हून अधिक राज्यांमध्ये ईडी, एनआयए आणि पोलिसांनी (police) १०० हून अधिक लोकांना अटक केली आहे. पीएफआयशी संबंधित लोकांच्या प्रशिक्षणाच्या हालचाली, टेरर फंडिंग आणि लोकांना संघटनेशी जोडण्याविरोधातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या