नाशिक, जळगावमध्ये फटाके फोडल्यास होणार इतका दंड

विक्री करण्यासही राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडून मनाई
नाशिक, जळगावमध्ये फटाके फोडल्यास होणार इतका दंड

नवी दिल्ली

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडून (NGT) महाराष्ट्रातील नाशिक, जळगावसह १७ शहरात फटाके वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. फटाके विकल्यास आणि उडवल्यासही दंड भरावा लागणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने फटाके विक्री आणि फटाके वाजवण्यावरही बंदी आणली आहे. येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांवरील बंदी कायम असणार आहे. फटाके विकल्यास २० हजार रुपये दंड, तर फटाके वाजवल्यास २००० रुपये दंड आकारण्याचा आदेश देण्यात आला आहे.

ही आहेत शहरे

वर्षभरात महाराष्ट्रातील अनेक शहरांत हवेचा दर्जा खालावल्याची माहिती असून त्यापैकी नाशिक, जळगाव, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, चंद्रपूर, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर, ठाणे, उल्हासनगर ही १७ प्रदूषित शहरे असल्याचे सांगण्यात आले आहे. तर येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांवरील बंदी कायम असणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com