सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी संपली; पुढील युक्तिवाद 'या' तारखेला

सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी संपली; पुढील युक्तिवाद 'या' तारखेला

नवी दिल्ली | New Delhi

राज्यातील सत्तासंघर्षावर (Power Struggle) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सलग तीन दिवस सुरु असलेली सुनावणी संपली आहे. आज सुरुवातीला ठाकरे गटाकडून वकील कपिल सिब्बल (Adv. Kapil Sibal) यांनी युक्तिवाद केला. यावेळी सिब्बल यांनी आक्रमक पवित्रा घेत राज्यपालांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत जोरदार युक्तिवाद (Argument) केला.

सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी संपली; पुढील युक्तिवाद 'या' तारखेला
.... अन् युक्तिवादाच्या शेवटी कपिल सिब्बल झाले भावूक

तर वकील अभिषेक मनु सिंघवी (Adv.Abhishek Manu Singhvi) यांनी युक्तिवाद केला. यावेळी सर्वोच्च नायालयात युक्तिवाद करताना नबाम रेबिया प्रकरणाचा दाखला देत अ‌ॅड. सिंघवी म्हणाले की, "नबाम रेबिया प्रकरणातही न्यायालयाने जवळपास आठ महिन्यांपूर्वीची परिस्थिती ग्राह्य धरून त्यानुसार निकाल दिला होता", असे म्हणत महाराष्ट्राच्या प्रकरणातही त्याचप्रकारे न्यायालयाने विचार करावा, असे म्हटले. त्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी २८ फेब्रुवारीला होणार असल्याचे सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी संपली; पुढील युक्तिवाद 'या' तारखेला
बहिणीची छेड काढल्याच्या वादातून एकाचा खून

दरम्यान, घटनापीठाचे कामकाज आज दुपारी तीन वाजेपर्यंत चालले. काँग्रेस नेते पवन खेरा (Pawan Khera) यांच्या अटकेबद्दलचे प्रकरण तातडीने ऐकण्यासाठी सरन्यायाधीश दुसऱ्या बेंचमध्ये असणार आहे. त्यामुळे आज एक तास आधीच युक्तिवाद संपला. यानंतर आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा आणि ठाकरे गटाचा उर्वरित युक्तिवाद पुढच्या आठवड्यात होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी संपली; पुढील युक्तिवाद 'या' तारखेला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे 'त्या' विधानावर स्पष्टीकरण; म्हणाले, अनावधानाने...
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com