Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकचे पुढील काही दिवस थंडीचेच

नाशिकचे पुढील काही दिवस थंडीचेच

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

राज्यात सर्वत्र थंडीचे (cold) प्रमाण वाढले असून नाशिक जिल्ह्यातील (nashik district) निफाड तालुक्यात (niphad taluka) नीचांकी तापमानाची (temperature) नोंद होत आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात (maharashtra) पुढील १०-१२ दिवस थंडीचेच राहणार आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस चांगलीच थंडी जाणवेल. दरम्यान, दि.२३ ते २६ असे चार दिवस तापमान किंचित कमी होणार आहे.

महाराष्ट्रात (maharashtra) मंगळवार दि.२२ पर्यन्त पहाटचे किमान तापमान कोकणात साधारण सरासरी पेक्षा २ ते ३ डिग्रीने खालावून १९ डिग्री तर उर्वरित महाराष्ट्रात ४ डिग्रीने खालावून १० ते ११ डिग्री पर्यन्त जाणवेल.

मध्य महाराष्ट्रात तर कदाचित एकांकी किमान तापमान जाणवेल. त्यामुळे पुढील तीन दिवस चांगलीच थंडी (cold) जाणवेल. दुपारचे कमाल तापमान महाराष्ट्रात मंगळवार दि.२२ पर्यन्त कोकणात (Konkan) सरासरी पेक्षा अर्ध्या डिग्रीने खालावून ३३ ते ३३.५ डिग्री तर उर्वरित महाराष्ट्रात दिड ते २ डिग्रीने खालावून २८ ते २९ डिग्री पर्यन्त जाणवेल.

त्यामुळे दिवसाचे तापमानही ऊबदार (warm) न राहता रात्रीच्या थंडीला पूरकच ठरेल. महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यातील थंडीचे (cold) हे दुसरे आवर्तन समजावे. मात्र, २३ ते २६ दरम्यान ४ दिवस थंडी किंचितशी कमी झाली तरी रविवार दि.२७ नोव्हेंबर पासुन थंडीच्या नोव्हेंबर मधील तिसऱ्या आवर्तनाला पुन्हा सुरवात होऊन थंडी वाढेल.

थंडी उत्तर भारतात काळा व भू -मध्य समुद्रात (Mediterranean Sea) उगम पावून तुर्कमेनीस्थान (Turkmenistan), ताजीकीस्थान (Tajikistan), उत्तर अफगाणिस्तान (Northern Afghanistan), पाकव्याप्त काश्मीर (Pakistan Occupied Kashmir), लेह लडाख (Leh Ladakh) ओलांडून

काश्मीरमध्ये उतरणाऱ्या मध्यम ते साधारण पश्चिमी झंजावातमुळे (वेस्टर्न डिस्टरबन्स) मुळे उत्तर भारतात पडणारा पाऊस व बर्फ मुळेसंपूर्ण नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्राला थंडी जाणवेळ. बंगालच्या उपसागरात कोणतेही चक्रीवादळ नसुन केवळ अतितीव्र कमी दाबमुळे तामिळनाडू पोंडेचेरी, आंध्र, केरळमध्ये पाऊस असेल. महाराष्ट्रात ना पाऊस ना ढगाळ मुळे थंडीचे वातावरण जाणवेल. असे पुणे वेधशाळेचे निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या