धनुष्यबाणावरील सुनावणीसाठी पुढील तारीख; वाचा सविस्तर

दोन्ही गटांकडून लेखी उत्तर मागविले
धनुष्यबाणावरील सुनावणीसाठी पुढील तारीख;  वाचा सविस्तर

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission of India ) आज शिवसेनेचं ( Shivsena )नाव आणि चिन्हावर महत्त्वाचा युक्तीवाद झाला. ठाकरे गटाचे मुख्य वकील कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. पक्षाची घटना, राष्ट्रीय पक्ष कार्यकारिणी, प्रतिनिधी सभा अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला.त्यानंतर ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला.

कामत यांचा युक्तिवाद संपल्यानंतर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. प्रतिनिधी सभा नाही तर लोकप्रतिनिधी सभा महत्त्वाची, असा युक्तिवाद जेठमलानी यांनी केला. दोन्ही गटाच्या वकिलांनी युक्तिवाद संपल्यानंतर निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची आणि अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली.

केंद्रीय निवडणूक आयागाने दोन्ही गटांना येत्या सोमवारी लेखी उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे. सोमवारी दोन्ही गटाचे उत्तर आल्यानंतर आयोगा कडून सुनावणीसाठी 30 जानेवारीची तारीख देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com