Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यापुढील 30-40 वर्षे भाजप युग

पुढील 30-40 वर्षे भाजप युग

हैदराबाद । वृत्तसंस्था Hydrabad

पुढील 30 ते 40 वर्षे देशात भाजपचेच युग असेल आणि या कालखंडात भारत ( India )विश्वगुरू होईल, असा दावा भाजपचे ( BJP)ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah)यांनी केला.

- Advertisement -

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक (Meeting of BJP National Executive)येथे आयोजित करण्यात आली . या बैठकीत अमित शहा यांनी पदाधिकार्‍यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपच्या उज्ज्वल भवितव्याबद्दल उपस्थितांना आश्वस्त केले. वंशवाद, जातीयवाद, तुष्टीकरण देशाच्या राजकारणासाठी शाप होता. तोच देशाच्या त्रासाचे कारण बनला, असे शहा म्हणाले.

तेलंगणा आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांतील घराणेशाहीचे शासन भाजप संपुष्टात आणेल. 2014 पासून केंद्रसत्तेत असलेला भाजप आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिशासह इतर राज्यांमध्ये सत्तेपासून दूर आहे. भविष्यात या राज्यांमध्येही भाजप सत्तेवर येईल, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला.

शहा यांनी यावेळी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला. काँग्रेस हा कुटुंबाचा पक्ष बनला आहे. या पक्षातील अनेक सदस्य पक्षांतर्गत लोकशाहीसाठी लढा देत आहेत. पक्षावरील नियंत्रण गमावण्याची भीती गांधी कुटुंबाला असल्याने पक्षातील संघटनात्मक निवडणुका हे कुटुंब होऊ देत नाही, असे टीकास्त्र शहा यांनी सोडले. देशातील विरोधी पक्ष असंतुष्ट आहेत. त्यामुळे केंद्र सरकार जे काही चांगले काम करत आहे त्याला विरोधक विरोध करत आहेत, असा आरोप शहा यांनी केला.

इतर समुदायांपर्यंत पोहोचा : मोदी

हिंदूंखेरीज इतर वंचित आणि दलित समुदायापर्यंत पोहोचावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या पदाधिकार्‍यांना केले. इतर समुदायांतदेखील वंचित आणि दलित वर्ग आहेत. आपण केवळ हिंदूंपुरते मर्यादित न राहता सर्व वंचितांसाठी काम करावे, असे मोदी म्हणाले. हैदराबादमध्ये भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मार्गदर्शन केले. उत्तर प्रदेशातील आझमगढ आणि रामपूर मतदारसंघांतील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला. या विजयात मुस्लीम मतदारांनी निर्णायक भूमिका बजावली. त्याची दखल घेऊन पंतप्रधानांनी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या पसमांदा मुस्लिमांसारख्या समुदायांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन पक्षाला केले.

केंद्राला विरोधी पक्षमुक्त भारत हवा : सिब्बल

राज्यसभेचे खासदार आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. भाजपने न्यायव्यवस्थेची गळचेपी करून देशात प्रत्यक्षात आणीबाणी आणली आहे. देशात दररोज कायद्याचे उल्लंघन केले जात आहे. केंद्र सरकारला फक्त काँग्रेसमुक्त भारत नको आहे तर विरोधी पक्षमुक्त भारत हवा आहे, असेही सिब्बल म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या