News Update # शहापूरजवळ भीषण अपघातात दोन विद्यार्थिनींसह चालक ठार

इंदूर-इच्छापूर महामार्गावरील अपघात, 18 जखमी
News Update # शहापूरजवळ भीषण अपघातात दोन विद्यार्थिनींसह चालक ठार

संजय यावलकर

बर्‍हानपूर - (Barhanpur)

इंदूर-इच्छापूर महामार्गावरील (Indore-Ichchapur highway) अपघात थांबण्याचे नाव घेत नाहीत. शहापूरजवळ (Shahapur) पुन्हा मोठा अपघात (accident) झाला. केळीने भरलेल्या आयशर ट्रकने (Eicher Truck) समोरून येणार्‍या रिक्षाला धडक (Hit the rickshaw) दिली. या अपघातात वाहन चालकासह (killed) वाहनात बसलेल्या दोन विद्यार्थिनींचा (two female students) मृत्यू झाला. तर अ‍ॅपेरिक्षामधील विद्यार्थिनी जखमी झाल्या. ट्रकमध्ये बसलेला हमालही जखमी झाला. घटनेनंतर घटनास्थळी मोठा जमाव जमला. ट्रक चालकाने वाहन सोडून घटनास्थळावरून पळ काढला.

विवेकानंद कॉलेज शहापूरसाठी 8 ते 10 विद्यार्थिनी अ‍ॅपेरिक्षामध्ये स्वार होऊन येत होत्या. केळीने भरलेला ट्रक शहापूरकडे जात असताना. मंगळवारी सकाळी 9.30 च्या सुमारास ट्रकने वाहनाला धडक दिली. ही धडकइतकी जोरदार होती की, त्यात अ‍ॅपेरिक्षा चालकासह दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. विद्यार्थिनींच्या मृत्यूनंतर येथे एकच गोंधळ उडाला. रुग्णालयात मोठ्या संख्येने लोक जमले होते. या धडकेत वाहनावरील 8 ते 9 मुली जखमी झाल्या. केवळ दोघांना गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातातील मयत

अपघातात दिनेश अर्जुन महाजन (40 वर्ष) चालक, विद्या तुकाराम (19 वषर्र्), पूजा रवींद्र (20 वर्षे) सर्व रा. बंबरा यांनी प्राण गमावले.

अपघातातील जखमी

भाग्यश्री अनिल (18 वर्षे), मोनिका कडू (17 वर्षे), रुपाली कैलास (18 वर्षे), आरती संजय (18 वर्षे) बांबरा भावना (18 वर्षे), वैष्णवी सर्व रा. बंबरा तर प्रजल नीलेश (19 वर्ष) रा. शाहपूर, आसिफ नवाब (22 वर्ष) रा. मगरूल, जमील हुसेन (22 वर्ष) रा. चुलखा, नईम फकिरा (29 वर्षे) रा. निंबोळा, राहुल सुरेश (25 वर्ष), अस्लम भिका (23 वर्षे), आसिफ शमशेरा (27 वर्षे), युसूफ कलीम (24 वर्ष) सर्व रा. चुलखान, निजाम फकिरा (वय 26 वर्ष) रा. थाठार हे अपघातामध्ये जखमी झाले आहेत.

मृतांच्या कुटुंबियांना दोन लाखाची मदत

इंदूर-इच्छापूर रस्त्यावर आज शाहपूर येथे झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे तसेच गंभीर जखमी झालेल्या नागरिकांना मदत मंजूर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com