Wednesday, May 8, 2024
Homeनाशिकघरपट्टी थकबाकीदारांनो बातमी तुमच्यासाठी; काय आहे महापालिकेची अभय योजना?

घरपट्टी थकबाकीदारांनो बातमी तुमच्यासाठी; काय आहे महापालिकेची अभय योजना?

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महापालिका क्षेत्रात गेली अनेक वर्षापासुन ठराविक मालमत्ताधारकांकडुन घरपट्टी भरली जात नसल्याने थकबाकीचे प्रमाण वाढत असतांनाच आता करोनाचा मोठा परिणाम वसुलीवर झाला आहे. यामुळेच आता घरपट्टी थकबाकी वसुलीसाठी महापालिकेकडुन रविवार (दि.1) पासुन अभय योजना राबविण्यात येणार आहे.

- Advertisement -

नाशिक महापालिकेकडुन गेल्या चार पाच वर्षात घरपट्टीची थकबाकी चांगल्या पैकी वसुलीचे काम या विभागाकडुन झाले आहे. मात्र कमी मनुष्यबळ आणि निवडणुकांचा अडसर घरपट्टी वसुलीला होतो. मागील काही वर्षात चांगल्या प्रकारे थकबाकी वसुल केल्यानंतर करोनामुळे घरपट्टी वसुलीवर मोठा परिणाम झाला आहे.

करोनामुळे अर्थिक फटका बसल्याने नियमित घरपट्टी भरणार्‍यांना देखील अडचणी निर्माण झाल्या आहे. घरपट्टी वसुलीला थंड प्रतिसाद मिळत आहे. परिणामी घरपट्टी थकबाकीचा आकडा आता 200 कोटींपर्यत जाऊन पोहचला आहे.

महापालिकेने नवीन अर्थिक वर्षात एप्रिल मध्ये 5, मे महिन्यात 3 व जुन महिन्यात 2 टक्के सवलत दिली असतांना यास फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर पुन्हा या सवलतीला मुदतवाढ देण्यात आल्यानंतरही मालमत्ताधारकांकडुन प्रतिसाद मिळाला नाही.

यामुळेच आता प्रशासनाकडुन करोनामुळे निर्माण झालेली अर्थिक कोंडी फोडण्यासाठी घरपट्टी थकबाकी वसुलीसाठी अभय योजना राबविण्यात येणार आहे. उद्यापासुन या अभय योजनेद्वारे मालमत्ता कराच्या थकबाकीदारांना करण्यात आलेल्या दंडात पहिल्या महिन्यात 75 टक्के सवलत दिली जाणार आहे. नंतरच्या दुसर्‍या महिन्यात दंडात 50 टक्के आणि शेवटच्या महिन्यात 25 टक्के सवलत दिली जाणार आहे.

नागपुर महापालिकेकडुन शंभर टक्के दंड माफ

नागपुर महापालिकेकडुन मालमत्ता कराच्या थकबाकीदारांसाठी शंभर टक्के दंड माफी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वाचाच मोठा अर्थिक फटका बसल्याने सत्ताधार्‍यांकडुन हा निर्णय घेण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या