नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस ‘या’ दिवशी घेतील शपथ

नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस ‘या’ दिवशी घेतील शपथ

मुंबई | Mumbai

महाराष्ट्राचे मावळते राज्यपाल (Governor) भगात सिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्यानंतर, त्यांच्या जागी, झारखंड (Jharkhand) मध्ये राज्यपाल म्हणून राहिलेले रमेश बैस (Ramesh Bais) आता महाराष्ट्राच्या राजभवनाची सूत्रे सांभाळणार आहेत.

बैस हे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची सूत्रे हाती घेण्याआधी झारखंड सरकारकडून (Government of Jharkhand) त्यांना नुकताच निरोप देण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल म्हणून रमेश बैस हे शनिवारी, १८ फेब्रुवारी रोजी राज्यपालपदाची शपथ (Governor's Oath) घेणार आहेत. त्यांचे उद्या शुक्रवारी १७ तारखेला सायंकाळी ५.४५ वाजता मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) आगमन होईल.

त्यानंतर शनिवार १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.४० वाजता दरबार हॉल, (Durbar Hall) राजभवन येथे शपथविधी समारंभ होणार असल्याचे राजशिष्टाचार विभागाने सांगितले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com