न्यूझीलंड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं

न्यूझीलंड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

न्यूझीलंडच्या (New Zealand) केरमाडेक बेटाला आज भूकंपाचे (Earthquakes) जोरदार धक्के जाणवले असून या भूकंपाची रिश्टर स्केलवर ७.१ एवढी तीव्रता नोंदवली गेली आहे. हा भूकंप इतका शक्तीशाली होता की केरमाडेक बेटासह (Kermadec Island) इतर आजुबाजूच्या बेटांनाही त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे...

न्यूझीलंड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं
'लाल वादळ' मुंबईवर धडकणार; शेतकरी आंदोलनावर ठाम

याबाबत स्थानिक सरकारच्या भूकंपीय मॉनिटर जियोनेटद्वारे दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे धक्के १० किलोमीटरवर खोलवर होते. तर भूकंप झाल्यानंतर काही सेकंद जमीन (Land) हादरली होती. त्यामुळे नागरिक घरातून तात्काळ बाहेर पडले. तसेच या भूकंपात किती नुकसान झाले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

न्यूझीलंड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं
पावसाळा, उन्हाळा की हिवाळा? नाशिककर संभ्रमात

दरम्यान, दुसरीकडे नॅशनल एमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीने न्यूझीलंडला त्सुनामीचा कोणताही धोका नसल्याचे म्हटले आहे. तसेच न्यूझीलंड हे दोन प्रमुख टेक्टोनिक प्लेटांच्या (प्रशांत प्लेट आणि ऑस्ट्रेलियन प्लेट) सीमेवर असल्याने न्यूझीलंडमध्ये दरवर्षी भूकंप येतात. तर काही दिवसांपूर्वी तुर्की (Turkey) सीरियात झालेल्या भूकंपात हजारोंच्यावर लोक (People) मृत्यूमुखी पडले होते. त्यानंतर अफगाणिस्तान आणि अन्य ठिकाणी देखील भूकंपाचे धक्के बसले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com