सोशल मीडियावरील चुकीचा मजकूर २४ तासांत काढावा लागणार

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी केंद्राची नवी नियमावली
सोशल मीडिया
सोशल मीडियाsocial media

नवी दिल्ली

सोशल मीडियासंदर्भात केंद्र सरकारने नवीन नियमावली जारी केली आहे. सोशल मीडियावरील चुकीचा मजकूर २४ तासांत काढावा लागणार आहे, अशी माहिती दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोशल मीडिया, OTT प्लेटफॉर्म व डिजिटल न्यूजसाठी नवीन नियमावली जारी केल्या आहे. यासंदर्भात माहिती देतांना दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद म्हणाले की, भारतात व्हॉट्सऍपच ५० कोटी, फेसबुकचे ४१ कोटी, इंस्टाग्रामचे २१ कोटी तर ट्विटरचे १.५ कोटी यूजर्स आहे. सोशल मीडियातून आक्षेपार्ह मजकूर, चुकीच्या बातम्या म्हणजेच फेक न्यूज येत असल्याच्या तक्रारी आल्या. यामुळे केंद्र सरकारने नवीन नियमावली जारी केली आहे. फेसबुक, ट्वीटरसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स यांना ही नियमावली बंधनकारक केली जाणार आहे.

“सोशल मीडियाला भारतात व्यवसाय करण्याची पूर्ण मुभा आहे. त्यांचे स्वागत आहे. सोशल मीडियाच्या युजर्सच्या तक्रारी निवारण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे. आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. आक्षेपार्ह फोटो टाकले जात आहेत. देशाच्या नागरी व्यवस्थेला धक्का लावणाऱ्या बाबी घडत आहेत. सोशल मीडिचा वापर दहशतवादी, देशविघातक शक्तींकडून केला जातो. मोठ्या प्रमाणावर फेक न्यूज देखील चालवल्या जातात. आर्थिक घोटाळे केले जात आहेत”, असं रवीशंकर प्रसाद यावेळी म्हणाले.

काय असेल नियमावली?

१) तक्रार निवारण व्यासपीठ आणि अधिकाऱ्याची नेमणूक करावी लागेल. तो तक्रार २४ तासांत नोंद करून घेईल आणि १५ दिवसांत तिचे निवारण करेल

२) जर युजर्सच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचवणारा मजकूर असेल, विशेषत: महिलांच्या, उदा. आक्षेपार्ह छायाचित्रे, असा मजकूर तक्रार दाखल झाल्यापासून २४ तासांत तो काढून टाकावा लागेल

३) भारतात चीफ कम्प्लायन्स ऑफिसर, नोडल कॉन्टॅक्ट पर्सन आणि रेसिडेंट ग्रीव्हन्स ऑफिसरची नियुक्ती करावी लागेल.

४) प्रत्येक महिन्याला तक्रारींचा अहवाल सादर करावा लागेल. महिन्याभरात किती तक्रारी आल्या आणि त्याच्यावर काय कारवाई केली

५) आक्षेपार्ह मजकूर सर्वात आधी कुणी सोशल मीडियावर टाकला ते सांगावं लागेल. जर तो मजकूर भारताबाहेरून आला असेल, तर तो भारतात पहिल्यांदा कुणी टाकला, हे सांगावं लागणार

६) युजर्सचं व्हेरिफिकेशन कोणत्या मार्गाने केलं गेलं, त्याची माहिती द्यावी लागेल

७) जर कुठल्या युजरचा डेटा किंवा ट्वीट किंवा मजकूर हटवला गेला, तर तुम्हाला युजरला सांगावं लागेल आणि त्याची सुनावणी करावी लागेल

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com