करोना संसर्ग रोखण्यासाठी नवी नियमावली

आशा कार्यकर्त्यांचे काम वाढणार
करोना संसर्ग रोखण्यासाठी नवी नियमावली
USER

नवी दिल्ली । वृत्तसंस्था

करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने देशातील आरोग्यसेवा आणि प्रशासनावर मोठा ताण आला आहे. आरोग्यसेवा हतबल झाली आहे. शहरी भागात करोना संसर्ग रोखण्यात यश येत असताना ग्रामीण भागात मात्र त्याचा प्रसार वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. शहरांसोबत ग्रामीण भागातील करोना प्रसार रोखण्यासाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

आशा कार्यकर्त्यांना प्रत्येक गावात जाऊन सर्दी-तापाची नोंद घ्यावी लागणार आहे. सॅनेटायझेशन आणि न्यूट्रिशन समितीही त्यांच्या सोबत असेल. करोना लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांना आरोग्य अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. करोना चाचणीनंतर अशा नागरिकांना विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात येणार आहे.

अहवाल येईपर्यंत त्यांना विलगीकरणात राहावे लागेल. 80 ते 85 टक्के रुग्णांना कोणतीच लक्षणे आढळत नाहीत. अशा रुग्णांना रुग्णालयात दाखल न करता त्यांना त्यांच्या घरात किंवा करोना केंद्रात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या रुग्णांना करोना नियमावलीचे पालन करणे बंधनकारक आहे. विलगीकरणातील रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे दिसल्यास त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करावेत, असे आदेश देण्यात आले आहेत.

चाचण्या, विलगीकरणावर भर

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नव्या नियमावलीत देखभाल, चाचण्या आणि विलगीकरणावर भर दिला गेला आहे. आशा कार्यकर्त्यांना त्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य अधिकारी आणि एएनएमला रॅपिड अँटीजन चाचण्या घेण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. देशातील प्रत्येक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात या चाचण्यांचे किट उपलब्ध केले जाणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com