Friday, May 10, 2024
Homeमुख्य बातम्याधुलिवंदनच्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या, तुमच्या शहरातील इंधनाचे भाव

धुलिवंदनच्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या, तुमच्या शहरातील इंधनाचे भाव

नवी दिल्ली | New Delhi

काही दिवसांपूर्वी घरगुती गॅसच्या (Domestic Gas) दरात ५० तर व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ३५० रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर आता पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and Diesel) दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईचा झटका बसणार आहे…

- Advertisement -

पाण्याच्या टाकीत पडल्याने दीड वर्षीय बालिका दगावली

देशात सरकारी तेल कंपन्या दररोज पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करत असल्याने दर सातत्याने वर खाली होत असतात. आज धुलिवंदनच्या दिवशी कच्च्या तेलाच्या किंमतीत (Price of Crude Oil) किंचित वाढ झालेली पाहायला मिळत असून गुरुग्रामध्ये पेट्रोल २१ पैसे आणि डिझेल २० पैशांनी महागले आहे. त्यानुसार आता या ठिकाणी पेट्रोल ९७.१० रुपये आणि डिझेल ८९.९६ रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे.

…अन् शेतकऱ्यांनी गावच काढलं विकायला; काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

त्याबरोबरच राजधानी दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे. तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोल १०६.३१ तर डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय कोलकात्यामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर असून चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर आहे. त्यामुळे याठिकाणी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या