Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यागौणखनिजसाठी नवे धोरण महसूलमंत्री विखे यांची माहिती

गौणखनिजसाठी नवे धोरण महसूलमंत्री विखे यांची माहिती

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

गौणखनिज व्यवसायातील (Minor Minerals Business) वाढत्या गुंडगिरीला (bullying) लगाम लावण्यासाठी व वाळूमाफियांना (Sand mafia) कायमचा आळा घालण्यासाठी लवकरच कडक धोरण अवलंबले जाणार असून 15 नोव्हेंंबरपर्यंंत नवीन धोरण जाहीर केले जाईल, असे आज महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhe-Patil) यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

- Advertisement -

विखे-पाटील महसूलमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांंदाच नाशिक (nashik) दौर्‍यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांंशी संंवाद साधला. म्हणाले, अवैध गौणखनिज (Illegal minor minerals) हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. त्यामुळे प्रदूषण (Pollution), कायदा आणि सुव्यवस्थेचाही (Law and order) प्रश्न गंभीर बनत आहे.

महसुली उत्पन्नापेक्षा प्रदूषण नियंत्रण (Pollution Control) काळाजी गरज आहे. म्हणूनच येत्या 21 ऑक्टोंबरला पुण्यात होणार्‍या जिल्हाधिकार्‍यांंच्या परीषदेत त्यांवर सखोल चर्चा होणार आहे. जिल्हाधिका़र्‍यांच्या सूचना जाणून घेऊन सर्व समावेशक धोेरण निश्चित केले बांधकामालाही वाळू, खडी उपलब्ध होईल व खात्याचा कारभारही सुरळीत चालेल. त्यानंतर जमीन मोजणीसाठी अर्ज दिल्यानतर ती कधी मोजली जाईल? याची शाश्वती सध्या कोेणीही देत नाही. म्हणून अर्ज दिल्यांतर एक महिन्यात मोजणी झाली पाहिजे. यासाठी खासगी एजन्सीची मदत घेणे, रोबोटच्या मदतीने मोजणी करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देत असल्याचे त्यांंनी सांगितले.

परवानगी (एनए) देताना येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी ऑॅनलाईन कारभाराची सोय केली जात आहेे. तसेच सध्या पावसाळा लांबल्याने अतिवृष्टीग्रस्तांंचे पंचनामे ऱखडले आहेत. त्यावरही त्यांनी ते लवकरात लवकर करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले. यावेळी आ. डॉ. राहुल आहेर, भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, माजी महापौर सतीश कुलकर्णी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावे

कायद्याचा दुरुपयोग या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून होणार्‍या टीकेचाही समाचार त्यांनी घेेतला. ठाकरेंनी आता आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला त्यांनी दिला. सत्ता गेली, आमदार सोडून गेल्याचे दुःख त्यांना होणारच. मात्र त्यामुळे कायद्याचा दुरुपयोग झाला असे म्हणता येणार नाही, असे ते म्हणाले.

उज्जैनच्या धर्तीवर त्र्यंबकचा विकास

देशातील देवस्थानांच्या विकासाला सरकार प्रोत्साहन देत असून बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिर व त्याच्या मार्गाचा विकास करण्यासाठी आपली शासनाच्या माध्यमातून एक हजार कोटींचा निधी देण्याची तयारी असल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले. देशभरातील शिवभक्तांच्या आस्थेचे केंद्र असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसराला विशेष महत्त्व असून कुंभमेळ्याच्या माध्यमातून या स्थानाचे विशेष महत्त्व आहे. त्या पार्श्वभूमीवर काशी उज्जैनच्या पाठोपाठ नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसराचे पुनर्निर्माण करून त्यासोबतच त्याच्या विशेष मार्गाची बांंधणी करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांना दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या