नवी दिल्ली | प्रतिनिधी

नव्या संसद भवनाचा भूमिपूजन समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या गुरुवारी म्हणजेच १० डिसेंबर रोजी होणार आहे. याबाबतची माहिती लोकसभेचे अध्यक्ष ओम बिल्ला यांनी नुकतेच सांगितले.

नवे संसद भवन ६४,५०० चौरस मीटर क्षेत्रफळावर बांधले जाणार असून या कामासाठी ९७१ कोटी रुपये खर्च येणार आहे. जुन्या संसद भवनाच्या इमारतीला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. याच सुमारास नवीन संसद भवनाच्या बांधकामासाही सुरुवात होणार आहे.

देशामध्ये जी सांस्कृतिक विविधता आहे, त्याचे चित्र नव्या संसद भवनात उमटणार आहे. देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनी संसदेचे अधिवेशन नव्या संसद इमारतीत होईल, अशी आशा करूया असे बिर्ला म्हणाले.

नव्या संसद भवनाची इमारत भूकंपरोधक असून इथे १ हजार २२४ खासदार एकत्र बसू शकतील, अशी व्यवस्था असेल. नवीन संसद भवनाच्या बांधकामात २ हजार प्रत्यक्ष तर ९ हजार जणांचा अप्रत्यक्ष सहभाग असेल असेही बिर्ला यांनी सांगितले.