Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशवैज्ञानिकांचे मोठे यश : मानवाच्या शरीरात शोधले नवीन अंग

वैज्ञानिकांचे मोठे यश : मानवाच्या शरीरात शोधले नवीन अंग

नवी दिल्ली

वैज्ञानिकांना मानवाच्या शरीरात एका नवीन अंगाची माहिती मिळाली आहे. मानवाच्या उत्पत्तीपासून हे अंग मानवाला माहीतच नव्हते.

- Advertisement -

नेदरलँडमधील वैज्ञानिक एका कँसर स्कॅन’ची तपासणी करत होते. त्यावेळी गळ्याच्या वरती मानवी शरीरातील एका नवीन अंगाची माहिती मिळाली. गळ्याच्या वरती नाकाच्या जवळ असणारी ग्रंथींचा (salivary glands) एका ग्रुपची माहिती वैज्ञानिकांना मिळाली. आतापर्यंत ही माहिती वैज्ञानिकांना नव्हती.

वैज्ञानिकांनी या नवीन अंगास Tubarial salivary glands नाव दिले आहे. हे अंग नाकात स्निग्धीकरण करण्याचे काम करते. वैज्ञानिकांना या अंगाचा शोध लागल्यानंतर १०० जणांची तपासणी केली. सर्वांचा शरीरात हे अंग मिळून आले. या ग्रंथी १.५ इंच लांब असतात.

यासंदर्भात वैज्ञानिकांनी संशोधन अहवालात म्हटले की, जर रेडिएशन ट्रीटमेंट दरम्यान या ग्रंथींना धोका निर्माण झाला नाही तर कँसर रुग्णांना त्याचा फायदा होतो. विशेषत: खाणे, चघळणे, बोलणे यासंदर्भात रेडिएशनचे होणारे दृष्यपरिणाम दिसत नाही. त्यासाठी ७३३ रेडिएशन झालेल्या रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. या रुग्णांच्या Tubarial salivary glands काहीच धोका झाला नव्हता.

- Advertisment -

ताज्या बातम्या