नवी दिल्ली। प्रतिनिधी

महाराष्ट्रासह इतर चार राज्यांत करोनाचा वाढता संसर्ग नियंत्रण आणण्यासाठी केंद्रीय आरोग्य विभागाने नवे आदेश आणि नियम जारी केले आहेत. त्यांची कठोर अंमलबजावणी राज्यांकडून होणे अपेक्षित आहे, असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने म्हटले आहे.

केरळ, महाराष्ट्रापाठोपाठ पंजाब, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या राज्यांतील करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याबद्दल केंद्र सरकार चिंतीत आहे. केंद्राच्या आदेशांनुसार वरील राज्यांना करोना संसर्गाच्या पाहणीवर तसेच करोनामुळे अधिक मृत्यू झालेल्या जिल्ह्यांत वैद्यकीय उपचार व्यवस्थापनावर जोर देण्यास सांगण्यात आले आहे.

आरटी-पीसीआर चांचण्या आणि गरज पडल्यास प्रतिबंधित क्षेत्रे यांची संख्या वाढवावी, रॅपिड अॅन्टिजेन टेस्ट निगेटिव्ह आलेल्या व्यक्तींनादेखील आरटी-पीसीआर चांचणी सक्तीची करावी, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे. हे सर्व आदेश आणि नियंमांचे कठोर पालन करण्यास राज्यांना बजावण्यात आले आहे.

करोनाचा संसर्ग काबूत आणण्यासाठी आजही मास्कचा वापर, सामाजिक अंतर आणि स्वच्छतेचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र लोक बेपर्वाईने वागत आहेत. नियंमांचे काटेकोर पालन होत नसल्याने करोना रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याचे सांगितले जात आहे. देशात आजपर्यंत 1 कोटी 6 लाखांपेक्षा अधिक जण करोनामुक्त झाले आहेत.

1 कोटी 70 लाखांपेक्षा अधिक व्यक्तींचे लसीकरण पूर्ण झाले आहे. करोनातून बरे होण्याचे प्रमाण 97.27 टक्के तर करोनामुळे होणार्या मृत्यूचा दर 1.42 वर आल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.