Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याशासन निर्णयानुसार लघु पाटबंधारे विभागासाठी नवीन आदेश जारी

शासन निर्णयानुसार लघु पाटबंधारे विभागासाठी नवीन आदेश जारी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शासन निर्णय क्र. ( GR )आस्थाप २०२२/प्र.क्र.१४०/जल-२ दिनांक २६ मे २०२२ नुसार पुर्नस्थापीत करण्यात येत असलेल्या सात उपविभाग व त्या उपविभागाचे कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आलेले आहे. तसेच यापुर्वी कार्यरत असलेले लघु पाटबंधारे (पुर्व /पश्चिम) विभाग ( Small Irrigation department ) जिल्हा परिषद ( Zilla Parishad ) नाशिक ऐवजी एकच कार्यालय ठेवण्यात आले असून सदर कार्यालय “जिल्हा जलसंधारण अधिकारी लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद नाशिक” (District Water Conservation Officer Small Irrigation Department Zilla Parishad Nashik) या नावाने पुर्नस्थापीत करण्यात आले आहे.

- Advertisement -

लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत कार्यरत सर्व संवर्गाच्या कर्मचाऱ्यांचे यांचे समायोजन करुन पुर्नस्थापनेने पदस्थापना देण्यात आलेले आहे. त्यात प्रामुख्याने कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, वरिष्ठ सहायक लिपिक, कनिष्ठ सहायक लिपिक, वाहनचालक, परिचर कर्मचारी यांचे समायोजन करण्यात आलेले असून उपविभागीय जलसंधारण अधिकारी यांचे शासन आदेशाचे अधिनस्त राहून तात्पुरते स्वरुपात तालुका निहाय जिल्हा परिषद अधिनस्त इतर विभागांमध्ये समायोजन करण्यात आलेले आहे.

राज्य शासनाच्या मृदा व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा जलसंधारण अधिकारी, उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालये नव्याने कार्यान्वित करणे व सर्व उपविभागीय कार्यालयाचे तालुका कार्यक्षेत्र खालील प्रमाणे शासन निर्णयानुसार घोषीत करण्यात आले आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक लीना बनसोड यांनी शासन निर्णयानुसार आदेश निर्गमित केले आहे.

कार्यालयाचे नवीन नाव – जिल्हा जलसंधारण अधिकारी, जिल्हा परिषद (ल.पा.) विभाग नाशिक

उपविभागाचे नाव मुख्यालय

१ जिल्हा परिषद (ल.पा) उपविभाग, मालेगांव – तालुका कार्यक्षेत्र मालेगाव, नांदगाव

२ जिल्हा परिषद (ल.पा) उपविभाग, येवला – तालुका कार्यक्षेत्र येवला, निफाड

३ जिल्हा परिषद (ल.पा) उपविभाग, दिंडोरी तालुका कार्यक्षेत्र – दिंडोरी, पेठ

४ जिल्हा परिषद (ल.पा) उपविभाग, कळवण तालुका कार्यक्षेत्र – कळवण, सुरगाणा

५ जिल्हा परिषद (ल.पा) उपविभाग, ईगतपुरी तालुका कार्यक्षेत्र – इगतपूरी, त्र्यंबकेश्वर (हरसूल)

६ जिल्हा परिषद (ल.पा) उपविभाग, सटाणा तालुका कार्यक्षेत्र – सटाणा, देवळा, चांदवड

७ जिल्हा परिषद (ल.पा) उपविभाग, नाशिक तालुका कार्यक्षेत्र – नाशिक, सिन्नर

- Advertisment -

ताज्या बातम्या