लघुउद्योगांना देखील नवी संधी निर्माण होणार - उद्योगमंत्री सुभाष देसाई

लघुउद्योगांना देखील नवी संधी निर्माण होणार - उद्योगमंत्री सुभाष  देसाई

सातपूर । प्रतिनिधी Satpur

नाशिकच्या विकासासाठी मोठा निर्णय घेतला असून मुकेश अंबानी यांचा रिलायन्स उद्योग समूह ( Reliance Industries Limited )दिंडोरी येथे उत्पादन केंद्र सुरू करणार आहे. लाईफ सायन्सेसची उत्पादन यंत्रणा उभारली जाणार आहे. सोबतच विविध औषधी लसींची उत्पादन करणार आहे. मोठा उद्योग येण्याने त्या परिसरातील छोट्या उद्योगांना संधी मिळत असते. त्यामुळे येथील लघुउद्योगांना देखील नवी संधी निर्माण होणार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई ( Industry Minister Subhash Desai )यांनी सांगितले.

अंबड उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनिश फार्मा इक्विपमेंट ( Anish Pharma Equipment ) उद्योगाच्या नव्या उत्पादन प्रक्रियेचा शुभारंभ करताना उद्योगमंत्री देसाई बोलत होते. ते म्हणाले, मागील काळात नाशिकला येणे शक्य झाले नाही. मात्र यापुढे सातत्याने नाशिकला भेट देऊन उद्योग विकासासाठी लक्ष घालणार आहे.

संपूर्ण जगाला उत्पादने पुरवणार्‍या चिन देशाला आपली उत्पादने विकणार्‍या अनिश फार्म इक्विपमेंट उद्योगाने निश्चितच मोठे काम उभे केले आहे. भविष्यात आणखी मोठा उद्योग उभा राहून नाशिकसह राज्याचे नाव मोठे करील, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक असणार्‍या गुणवत्तेबाबत विशेष लक्ष वेधले. अनिश उद्योग आज ऑस्ट्रेलिया अमेरिका भारतातील उद्योगांसह चीनला उत्पादने पुरवित आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यात करणे सहज सोपे नसून, त्यासाठी आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागते.

सामंत बंधूनी आपली उत्पादने विविध देशांना पाठवून गुणवत्ता सिद्ध केल्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. अनिश यांच्या औषध उत्पादनबाबत बोलताना औषधे क्षेत्र आज जगातील महत्त्वाचे क्षेत्र झाले आहे. जगभरात येणार्‍या काळात त्याची मोठी गरज लागणार आहे. संपूर्ण जग आज स्वास्थ्य संवर्धनाकडे व सुरक्षिततेकडे गांभीर्याने पाहत असल्याने या उद्योगाला आणखी मोठी संधी निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com