Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यानवीन नाशिक बनले करोनाचे 'मेजर हॉटस्पॉट'

नवीन नाशिक बनले करोनाचे ‘मेजर हॉटस्पॉट’

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महापालिका क्षेत्रात आत्तापर्यत 9 हजार 136 असे सर्वाधिक करोना रुग्ण पंचवटीत असले तरी गेल्या पंधरा दिवसात नवीन नाशिक विभागात तब्बल अडीच हजार नवीन रुग्ण आढळून आले आहे…

- Advertisement -

सध्या शहरातील सहा हजारावरील अ‍ॅक्टीव्ह रुग्णांत एकट्या नवीन नाशिक भागातील निम्मे रुग्ण आहे. याभागातील लोकसंख्येची घनता व नियमांचे पालन न केल्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. याच कारणामुळे सध्या नवीन नाशिक शहरातील मेजर हॉटस्पॉट बनला आहे.

नाशिक महापालिका क्षेत्रात आत्तापर्यत 39 हजाराच्या वर करोना रुग्ण आढळून आले असुन 600 च्यावर रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

या एकुणच रुग्णांत सर्वाधिक असले 9 हजार 136 रुग्ण एकट्या पंचवटी विभागात आहे. त्यानंतर दुसर्‍या क्रमांकावर नवीन नाशिक असुन याठिकाणी 8 हजार 388 एकुण रुग्ण झाले आहे.

नाशिक शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या जुने नाशिक व वडाळागांव परिसरात पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात करोना संसर्ग वाढला होता. आता अशीच स्थिती नवीन नाशिक भागात झाली आहे.

याठिकाणी गेल्या चौदा पंधरा दिवसात 3 हजार 665 इतके नवीन रुग्ण आढळून आले आहे. याभागातील घराची रचना गर्दीची असुन बाजारपेठा व भाजीपाला बाजार याठिकाणी मोठी गर्दी होते. एकुण अरुंद रस्ते, घराला लागु असलेली घरे या दाटीमुळे करोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

तसेच याभागात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग असुन लहान मोठे व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. याभागात बाधीतांकडुन गांभीर्याने काळजी घेतली जात नसुन सामाजिक अंतर, मास्क वापर न करणे व सॅनिटाईजेशन न करणे आदीमुळे संसर्ग वाढला जात आहे.

याच कारणामुळे आता नवीन नाशिक भाग मेजर हॉटस्पॉट बनला आहे. आता पुढच्या काळात नागरिकांनी काळजी न घेतल्यास याठिकाणी गंभीर स्थीती निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

नवीन नाशिक भागातील करोना स्थिती

पवननगर भागात एकुण रुग्ण 1471 व अ‍ॅक्टीव रुग्ण 560.

जुन सिडको एकुण रुग्ण 1300 व अ‍ॅक्टीव 471.

पाथर्डी फाटा भागात एकुण रुग्ण 1100 व अ‍ॅक्टीव रुग्ण 546.

मेजर हॉटस्पॉट भागात – पवननगर, शिवाजी चौक , राणाप्रताप चौक, दत्तचौक, लेखानगर, गोविंदनगर, पाथर्डी फाटा परिसर.

मनपा विभागनिहाय करोना रुग्ण स्थिती

दि. 16 सप्टेंबरची स्थिती

प्रभाग नाव रुग्ण संख्या

पंचवटी – 9136

नवीन नाशिक – 8388

नाशिकरोड – 6732

नाशिक पुर्व – 6003

सातपूर – 4040

नाशिक पश्चिम – 3376

नाशिक सिटी कोविड-19 डॅशबोर्ड वरुन..

- Advertisment -

ताज्या बातम्या