नवी मुंबई विमानतळाच्या वादात आता राज ठाकरेंची उडी, सुचवले हे नाव...

नवी मुंबई विमानतळाच्या वादात आता राज ठाकरेंची उडी, सुचवले हे नाव...
राज ठाकरे

मुंबई

नवी मुंबई विमानतळ नामकरणावरुन सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकारने विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याचा निर्णय घेतला असताना स्थानिकांकडून दि बा पाटील यांचं नाव देण्याची मागणी होत आहे. दरम्यान या वादावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

राज ठाकरे
भुजबळ खुर्चीवर बसताच आंदोलक आक्रमक

विमानतळ नामकरणावरून नवी मुंबईचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांनी आज मुंबईत 'कृष्णकुंज'वर राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत राज यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देणंच संयुक्तिक राहील असं राज यांनी सांगितलं.

नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याबाबत स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन पुकारलं आहे. तर शिवसेनेनं विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर राज यांनी त्यांची भूमिका जाहीर केली. राज ठाकरे म्हणाले, “नवी मुंबईच्या विमानतळाचा प्रस्ताव आला तेव्हा मला आत्ताचं विमानतळ देशांतर्गत आणि नवी मुंबईचे विमानतळ आंतरराष्ट्रीय होणार अशी माहिती देण्यात आली होती. ते जरी नवी मुंबईत, पनवेलमध्ये होत असलं तरी ते मुंबई विमानतळच असणार आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याने नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळच नाव राहणार असं मला वाटतं. परदेशातून व्यक्ती महाराष्ट्रात येतो तेव्हा शिवरायांच्या भूमीत येतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळालाही शिवरायांचं नाव असेल असं मला वाटतं. हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे होणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ छत्रपती शिवाजी महाराजांच्याच नावाने होईल. बाळासाहेब किंवा दि. बा. पाटील यांच्या मोठपणाबद्दल दुमत नाही,” असंही राज ठाकरे यांनी सांगितलं.

बाळासाहेब असते तर...

“बाळासाहेब असते तर त्यांनी स्वत: सांगितलं असतं की छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असायला हवं. नामांतराचा वाद हेच दुर्दैव आहे.आता कोण रस्त्यावर उतरतं बघू असं सांगताना राज ठाकरेंनी वेळ आली तर उद्धव ठाकरेंशी बोलेन. पण यामध्ये काही विषय दिसत नाही असं सांगितलं आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com